Lifestyle : जीवनातले उद्देश स्पष्ट ठेवा, जगणं होईल सुकर, जपानी नागरिकांची पंचसूत्री येईल कामी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आयुष्य जगण्यासाठी लागणारा उद्देश माहित असेल तर जगणं सुकर होतं. अनेकदा वयामुळे, चिंता, तणावामुळे आयुष्य निरर्थक वाटू शकतं. अशावेळी सवयी, छंद या सगळ्या गोष्टी असतातच शिवाय जीवनशैलीतले बदल मोलाचे असतात. जपानी नागरिक यासाठी पाच सूत्र वापरतात, त्याविषयीची ही माहिती.
मुंबई : जपानी नागरिकांची जीवनशैली आपल्यापेक्षा अनेक बाबतीत वेगळी आहे. परंपरा जपण्याबरोबरच आधुनिकतेचा मिलाफ करत जपानी लोक जीवन व्यतित करतात. यात स्वच्छता, उच्च तंत्रज्ञानाचा वापर आणि याचाही योग्य वापर केला जातो. जपानी नागरिक केवळ तंत्रज्ञानावरच विश्वास ठेवत नाहीत तर अनेक संकल्पनांवरही विश्वास ठेवतात.
आयुष्य जगण्यासाठी लागणारा उद्देश माहित असेल तर जगणं सुकर होतं. अनेकदा वयामुळे, चिंता, तणावामुळे आयुष्य निरर्थक वाटू शकतं. अशावेळी सवयी, छंद या सगळ्या गोष्टी असतातच शिवाय जीवनशैलीतले बदल मोलाचे असतात. जपानी नागरिक यासाठी पाच सूत्र वापरतात, त्याविषयीची ही माहिती.
याबद्दल अनेक पुस्तकांमधेही माहिती लिहिलेली आढळते. डॉ. शालिनी सिंह साळुंके अशाच पाच जपानी तंत्रांबद्दल माहिती दिली आहेत. या तंत्रांचा अवलंब केल्यानं आरोग्य चांगलं राहील, चिंता दूर होईल, ताणतणाव व्यवस्थापन शक्य होईल आणि यश मिळवण्यासाठीचा मार्ग सुकर होईल.
advertisement
जीवन बदलणारे पाच जपानी तंत्र
शिनरीन-योकू
शिनरीन-योकू म्हणजे निसर्गासोबत वेळ घालवणं. याला वन स्नान असंही म्हणतात. निसर्गाच्या सानिध्यात असल्यानं शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी होईल. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. तणाव कमी करणं आणि मूड सुधारणं याव्यतिरिक्त, शिन रिन योकूमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात देखील मदत होते.
advertisement
ओसोजी
जपानी भाषेत याचा अर्थ तुमच्या सभोवतालची जागा स्वच्छ ठेवणं. यामुळे मनाला शांती देखील मिळते.
यामुळे चिंता दूर होते आणि सकारात्मकता टिकून राहते.
शुकांका
जीवनात शुकांका अंगीकारणं म्हणजे दररोज एक सकारात्मक गोष्ट करणं. ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामध्ये, तुम्ही तुमची जीवनशैली आणि सवयी चांगल्यासाठी बदलता.
advertisement
हारा हाची बु
याचा अर्थ असा की भुकेच्या केवळ ऐंशी टक्केच अन्न खाणं. यामुळे तुमचं पचन व्यवस्थित राहील. पोट निरोगी असेल तर मन निरोगी असतं. अशावेळी, हारा हाची बु मुळे, ऊर्जा वाढवणं, पचन सुधारणं आणि एकूण आरोग्य सुधारण्यात बदल दिसून येतो.
इकिगाई
इकिगाई म्हणजे तुमच्या जीवनाचा उद्देश शोधणं, असं ध्येय शोधणं जे साध्य करण्याच्या उत्साहानं तुम्ही दररोज जागे होता. इकिगाई प्रेरणा वाढवते, उद्देशाची जाणीव करुन देते आणि जीवन पूर्वीपेक्षा अधिक परिपूर्ण बनवते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 21, 2025 7:56 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Lifestyle : जीवनातले उद्देश स्पष्ट ठेवा, जगणं होईल सुकर, जपानी नागरिकांची पंचसूत्री येईल कामी