Diet : वयानुसार खाणं गरजेचं, आजार राहतील दूर, प्रकृती राहिल ठणठणीत

Last Updated:

आपण जसजसं मोठे होतो तसतसं आपल्या शरीराच्या गरजा देखील बदलतात. जे पदार्थ आपण विसाव्या वर्षी कोणताही ताण न घेता खायचो आणि पचवायचो, तेच पदार्थ तिशीत आपल्या शरीरात चरबी जमा करणारे ठरू शकतात. पण अनेकदा याचा विचार होत नाही. हे सत्य ज्यांना आचरणात आणायचं नाही ते तेवढंच खातात, म्हणजेच आहारात योग्य तो बदल करत नाहीत, ज्यामुळे अशा व्यक्तींना लहान वयातच हृदय आणि पोटाशी संबंधित अनेक समस्यांचा त्रास होतो.

News18
News18
मुंबई : रोज कोणती भाजी करायची हा प्रत्येक घरातला चर्चेचा मुद्दा असतो. पण रोज आपल्या पोटात जे जातंय ते आपल्या प्रकृतीला अनुकूल आपण खातो का हे देखील लक्षात ठेवायला हवं.
आपण जसजसं मोठे होतो तसतसं आपल्या शरीराच्या गरजा देखील बदलतात. जे पदार्थ आपण विसाव्या वर्षी कोणताही ताण न घेता खायचो आणि पचवायचो, तेच पदार्थ तिशीत आपल्या शरीरात चरबी जमा करणारे ठरू शकतात. पण अनेकदा याचा विचार होत नाही. हे सत्य ज्यांना आचरणात आणायचं नाही ते तेवढंच खातात, म्हणजेच आहारात योग्य तो बदल करत नाहीत, ज्यामुळे अशा व्यक्तींना लहान वयातच हृदय आणि पोटाशी संबंधित अनेक समस्यांचा त्रास होतो.
advertisement
आपल्या वयानुसार आपल्या आहाराकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे, अन्यथा आरोग्याशी संबंधित समस्या सुरू होऊ शकतात. तीस वर्षापूर्वीचं शरीर आणि आताची प्रकृती यात साहजिकच फरक आहे. तीस वर्षांखालील तरुणांमधे चयापचय प्रक्रिया खूप जलद असते. या वयात, शरीरात जे काही पदार्थ जातात, ते दूध, तूप, चीज किंवा तेलकट अन्न असो - ते ते सहजपणे पचवता येतात. म्हणूनच 20-25 वयोगटातील तरुणांनी दोन प्लेट जेवण खाल्लं म्हणजे थोडं जरी जास्त खाल्लं तरी त्यांचं वजन खूप वाढत नाही.
advertisement
तिशीनंतर काय होतं ?
जेव्हा एखादी व्यक्ती तीस वर्षांची होते तेव्हा त्याचा चयापचय दर हळूहळू कमी होतो. याचा अर्थ असा की शरीर पूर्वीसारखं अन्न लवकर पचवू शकत नाही. यामुळे, पूर्वी ऊर्जा देणारं तेच अन्न आता चरबी म्हणून साठवलं जाऊ लागतं आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.
advertisement
वयानुसार कसं खावं ?
वय 20 ते 30 - भरपूर कॅलरीज असलेला आहार घेता येतो. दूध, दही, तूप, सुकामेवा इत्यादींचा आहारात समावेश करता येतो. या वयात शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिक हालचाली जास्त ठेवणं गरजेचं आहे.
वय 30 ते 40: - तूप, तेल, चीजचं प्रमाण कमी करा. अधिक सॅलड, हिरव्या भाज्या, कमी चरबीयुक्त दूध, फळं खा. साखर आणि प्रक्रिया केलेलं अन्न टाळा. नियमित व्यायाम करा.
advertisement
वय 40 ते 50: - पचनक्रिया चांगली राहण्यासाठी उच्च फायबरयुक्त आहार घ्या. मीठ आणि साखरेचं सेवन नियंत्रित करा. दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करा.
पन्नाशीनंतर: हलकं, सहज पचणारं आणि घरी शिजवलेलं अन्न खा. मसालेदार आणि तेलकट अन्न टाळा. प्रथिनं आणि कॅल्शियमचं सेवन वाढवा. उदा. डाळी, दूध, चीज यांचं प्रमाण मर्यादित ठेवा.
advertisement
वय वाढत असताना शरीरात अनेक बदल होतात. हार्मोन्समध्ये बदल होतात, स्नायू कमकुवत होणं, पचन मंदावणं अशा परिस्थितीत जर आपण आपल्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली बदलली नाही तर लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल सारख्या आजारांचा धोका वाढतो.
प्रत्येक वयात समान प्रमाणात आणि समान अन्न खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. म्हणूनच, आपण आपल्या वयानुसार आपला आहार संतुलित करणं महत्वाचं आहे. वय वाढत असताना, शरीराला हलकं, पौष्टिक आणि सहज पचणारं अन्न आवश्यक असतं आणि हेच खऱ्या निरोगी जीवनशैलीचं रहस्य आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Diet : वयानुसार खाणं गरजेचं, आजार राहतील दूर, प्रकृती राहिल ठणठणीत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement