चेहऱ्यावरील चमक कमी होण्याची अनेक कारणं आहेत. त्वचेवरच्या मृत पेशींमुळे त्वचेवर चमक येत नाही आणि चेहऱ्यावर एक थर आहे असं वाटतं. हा त्रास तुम्हालाही होत असेल तर रोज सकाळी कच्चं दूध चेहऱ्यावर लावा. कच्चं दूध नीट चोळून सकाळी चेहऱ्यावर लावलं आणि नंतर चेहरा धुवून मॉइश्चरायझर लावल्यास चेहरा उजळतो.
Salt : जास्त मीठ खाणं तब्येतीसाठी धोकादायक, ही लक्षणं लक्षात ठेवा, प्रकृतीची काळजी घ्या
advertisement
दुधाचा क्लीन्झरसारखा वापर करा
चेहऱ्यावर साचलेली धूळ हटवून चेहराह स्वच्छ करण्यासाठी क्लिंझरचा वापर केला जातो. क्लींजर म्हणून लावण्यासाठी एका भांड्यात दूध घ्या आणि त्यात कापूस बुडवा आणि चेहऱ्यावर हळू चोळा. चेहऱ्यावरचा धुळीचा थर गेला की 2 ते 3 मिनिटांनी चेहरा पाण्यानं धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा. चेहरा खूप मऊ होईल आणि चेहऱ्यावर चमक येईल.
दूध, मध आणि तांदळाचं पीठ
चेहऱ्यावरची चमक कायम ठेवण्यासाठी एक घरगुती फेसपॅक बनवण्यासाठी 2 चमचे तांदळाच्या पिठात एक चमचा मध आणि आवश्यकतेनुसार दूध मिसळून फेस पॅक तयार करा आणि चेहऱ्याला लावा.
15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा. या फेसपॅकने चेहरा उजळतो.
Weight Loss : वजन कमी करायचं असेल तर मूल व्हा ! तीन सवयींमुळे कमी होईल वजन
दूध आणि गुलाब पाणी
दूध आणि गुलाबपाणी हे मिश्रण त्वचेसाठी उत्तम मानलं जातं. या दोन गोष्टी समान प्रमाणात मिसळून चेहऱ्यावर लावल्यानं त्वचा सुधारते. हे मिश्रण 20 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा. चेहरा उजळेल.
चेहऱ्यासाठी कच्च्या दुधाचे फायदे
कच्च्या दुधातल्या लॅक्टिक ॲसिडमुळे त्वचा निरोगी राहते. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते आणि ती चमकदार दिसते. दुधामुळे त्वचेला व्हिटॅमिन ए, डी, ई आणि बी12 देखील मिळतात.
कच्च्या दुधामुळे त्वचेच्या ऊती दुरुस्त होतात, चेहऱ्यावरचा खडबडीतपणा कमी होतो. त्वचेतून टॅनिंग काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. कच्च्या दुधात आढळणाऱ्या खनिजांमुळे त्वचेचा टोन चांगला राहतो आणि हायड्रेशन वाढवण्यासाठीही कच्चं दूध प्रभावी आहे.