चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी महागडी सौंदर्यप्रसाधनं वापरुन त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. कोणत्याही दुष्परिणामांशिवाय नैसर्गिक पद्धतीनं चेहऱ्यावरची चमक परत आणायची असेल, तर नैसर्गिक उपायांची मदत होऊ शकते.
Foot Massage : रोज करा पायांना मसाज, प्रकृतीसाठी गुणकारी आयुर्वेदिक उपाय
आयुर्वेदात शतकानुशतकं त्वचेसाठी चंदनाचा वापर केला जातो. कारण चंदनामुळे, चेहरा थंड राहतो, चंदनामुळे चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि त्वचा उजळ दिसते. गुलाबपाण्यानं त्वचेला टोन मिळतो, चेहऱ्यावरची आर्द्रता टिकवून ठेवता येते आणि चेहऱ्याचा पोत सुधारतो.
advertisement
चंदन-गुलाबपात्राचा फेसपॅक बनवण्यासाठी एक टीस्पून चंदन पावडर, दोन-तीन टीस्पून गुलाबपाणी हे साहित्य आवश्यक आहे. एका भांड्यात एक टीस्पून चंदन पावडर घ्या. त्यात हळूहळू गुलाबजल घाला आणि जाडसर पेस्टप्रमाणे मिश्रण बनवा. हे मिश्रण ब्रश किंवा बोटांच्या मदतीनं स्वच्छ केलेल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. हे मिश्रण पंधरा-वीस मिनिटं सुकू द्या. नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा आणि मऊ टॉवेलनं चेहरा पुसा.
हा फेसपॅक दररोज रात्री झोपण्यापूर्वी लावणं चांगलं. यामुळे संपूर्ण रात्र त्वचेला आराम मिळतो आणि चेहऱ्यावरील पेशी दुरुस्त होतात आणि सकाळपर्यंत चेहरा फ्रेश दिसतो.
यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते. त्वचा मऊ होते. डाग हळूहळू कमी होतात. तेलकट त्वचेतील तेलाचं प्रमाण नियंत्रित होतं. मुरुम आणि त्वचेच्या अॅलर्जीपासून आराम मिळतो.
त्वचा खूप कोरडी असेल तर गुलाबपाण्यात थोडं कोरफड जेल मिसळू शकता. आठवड्यातून एकदा कच्च्या दुधात चंदन मिसळून लावल्यानं टॅनिंग देखील दूर होतं. नेहमी रसायनविरहित शुद्ध चंदनाचा वापर करा.
