स्क्रीनवर जास्त वेळ काम करणं, झोपेची कमतरता किंवा खाण्याच्या वाईट सवयी यासारख्या अनेक कारणांमुळे आपली ऊर्जा हळूहळू कमी होते. अनेकदा फ्रेश वाटण्यासाठी जास्त चहा - कॉफी प्यायली जाते. पण जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणं हानिकारक असू शकतं. यासाठीच आहारतज्ज्ञ श्वेता शाह यांनी दिलेल्या पर्यायामुळे दुष्परिणामांशिवाय नैसर्गिकरित्या ऊर्जा वाढवण्यास मदत होते.
advertisement
आपल्या स्वयंपाकघरात वापरला जाणारा मसला म्हणजे चक्री फूल..आळस आणि थकवा दूर करण्यासाठी आणि त्वरित ऊर्जा मिळविण्यासाठी, स्टार अॅनीज म्हणजेच चक्री फुलाचं पाणी पिणं हा चांगला पर्याय आहे. चक्री फूल हा एक पारंपरिक मसाला आहे, मुख्यतः बिर्याणी किंवा गरम मसाल्यांमध्ये याचा वापर होतो. पोषणतज्ज्ञांच्या मते, हाच मसाला नैसर्गिकरित्या ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
Cortisol : कॉर्टिसॉल कमी करण्यासाठीच्या पाच युक्त्या, निरोगी, आनंदी राहण्यासाठीचा मंत्र
चक्री फुलाचं पाणी पिण्याचे फायदे -
इतर अनेक आरोग्य अहवालांमध्येही स्टार अॅनीस ऊर्जा वाढवण्यासाठी फायदेशीर असल्याचं संशोधन झालं आहे. स्टार अॅनीजमध्ये काही नैसर्गिक संयुगं असतात. त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात तसंच संसर्गाशी लढणारे घटक आणि सौम्य उत्तेजक असतात.या सगळ्यामुळे, शरीरातील चयापचय गतिमान करणं शक्य होतं आणि रक्ताभिसरण सुधारतं. यामुळे तात्काळ ऊर्जा मिळण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.
चांगलं पचन
चक्री फुलाचं पाणी प्यायल्यानं पचनसंस्था सुधारते, ज्यामुळे अन्न योग्यरित्या पचते आणि शरीराला अधिक ऊर्जा मिळते.
Summer Care Tips : उन्हाळ्यातही राहा फ्रेश, नैसर्गिक उपायांची होईल मदत
रक्ताभिसरणासाठी उपयोगी
चक्री फुलाचं पाणी पिण्यानं रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्व शरीराच्या अवयवांपर्यंत योग्यरित्या पोहोचण्यास मदत होते. यामुळे उर्जेची पातळी वाढण्यासही मदत होते.
रोगप्रतिकार शक्तीसाठी उपयुक्त
चक्री फुलामध्ये शिकिमिक अॅसिड असतं, यामुळे विषाणूजन्य संसर्गाशी लढण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी मदत होते. शरीर निरोगी असल्यानं थकवा कमी होतो.
यासाठी 1 ते 2 चक्री फुलं रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.सकाळी पाणी गाळून बाटलीत भरा.पोषणतज्ज्ञ दिवसभरात कमी प्रमाणात हे पाणी पिण्याची शिफारस करतात. यामुळे शरीर दिवसभर ऊर्जावान राहू शकतं.