केसांच्या घनदाट वाढीसाठी कायम वापरला जाणारा उपाय म्हणजे नारळाचं तेल. या तेलात आणखी काही घटक मिसळून लावले तर केसांची चांगली वाढ होते. तुम्हालाही केस लांब, जाड आणि मजबूत करायचे असतील तर, नारळाच्या तेलात कोरफडीचा गर मिसळून लावू शकता. केस लांब करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या केसांच्या उत्पादनांऐवजी घरगुती उपचारांचा अवलंब करायचा असेल, हा कायमच हमखास उपाय आहे.
advertisement
Kidney Failure : मूत्रपिंडं निकामी होण्यापासून रोखा, आजपासूनच काळजी घ्या
केस दाट, लांब, काळेभोर करण्यासाठी नारळाचं तेल उपयुक्त आहे. यासाठी नारळाच्या तेलात कोरफड मिसळून मास्क बनवू शकता. यासाठी नारळाचं तेल आणि कोरफडीचा गर चांगल्या तऱ्हेनं मिसळावं लागेल.
नंतर हे मिश्रण केसांना व्यवस्थित झाकून ठेवा. 10 ते 15 मिनिटांनंतर, कोमट पाण्यानं केस धुवा. आठवड्यातून दोनदा हे मिश्रण केसांवर लावू शकता.
Papaya Seeds: आरोग्यासाठी पोषक पपईच्या बिया, असा करा उपयोग
केसांच्या वाढीसाठी नारळ तेल उपयोगी ठरतं ते त्यातल्या गुणधर्मांमुळे. नारळाच्या तेलात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे केसांची चांगली काळजी घेतली जाते. केसांचा पोत मजबूत करण्यासाठीही नारळाचं तेल उपयुक्त आहे. कारण त्यात प्रथिनं आणि व्हिटॅमिन ई असतं, इतकंच नाही तर केसांच्या वाढीसाठीही नारळाचं तेल उपयुक्त आहे.
केसांसाठी कोरफडीचा उपयोग चांगला मानला जातो कारण कोरफड हा एक उत्कृष्ट आर्द्रता देणारा घटक आहे. म्हणजेच तो केस आणि टाळू दोन्ही खोलवर हायड्रेट करू शकतो. कोरफडीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई आढळतात, या घटकांचा केसांची लांबी वाढवण्यासाठी उपयोग होतो.