तसं तर, बरेच लोक व्यायामापूर्वी केळी खातात. केळी खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, पण रोज केळी खाऊन कंटाळा आला असेल, तर आता तुम्ही हे पौष्टिक आणि आरोग्यदायी घरगुती ड्रिंक पिऊन व्यायाम करू शकता. हे आरोग्यदायी प्री-वर्कआउट ड्रिंक तयार करण्यासाठी तुम्हाला कोणते घटक लागतील आणि ते बनवण्याची पद्धत काय आहे, ते जाणून घेऊया...
advertisement
न्यूट्रिशनिस्ट अमित बैसोया यांनी त्यांच्या iamitbaisoya या इंस्टाग्राम अकाउंटवर या प्री-वर्कआउट एनर्जी ड्रिंकबद्दल माहिती दिली आहे. या दोन प्री-वर्कआउट ड्रिंक्सची रेसिपी जाणून घेऊया.
प्री-वर्कआउट घरगुती एनर्जी ड्रिंक
तज्ञांच्या मते, व्यायामापूर्वी तुम्हाला ऊर्जा देईल असं काहीतरी खावं. अशा परिस्थितीत केळी सर्वोत्तम मानली जातात, पण रोज केळी खाऊन कंटाळा येतो. अशा परिस्थितीत, प्री-वर्कआउटपूर्वी हे घरगुती एनर्जी ड्रिंक बनवून प्या. ते बनवण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी लागतील...
पहिलं ड्रिंक तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू
- सातू - 2 चमचे
- मीठ - 6 ग्रॅम
- मध - अर्धा चमचा
- पाणी - आवश्यकतेनुसार
एका ग्लासमध्ये सातू, मध आणि मीठ टाका. आता अर्धा ग्लास पाणी घालून ते चांगले मिसळा. आता व्यायामाच्या 15 मिनिटे आधी ते प्या. तुम्हाला भरपूर ऊर्जा आणि ताकद मिळेल. जेव्हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम कराल, तेव्हा हे प्री-वर्कआउट ड्रिंक पटकन तयार करून प्या. सातूचे सेवन केवळ पोटासाठीच आरोग्यदायी नाही, तर त्यात प्रथिने असल्यामुळे स्नायूही मजबूत होतील.
दुसरं ड्रिंक तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू
- 4-5 खजूर
- 6-7 भिजवलेले बदाम
- थोडी कॉफी
- पाणी
हे दोन्ही मिक्सरमध्ये टाकून बारीक करा. आता त्यात थोडी कॉफी आणि एक कप पाणी घालून मिक्स करा. ते एका जार किंवा ग्लासमध्ये ओता. त्यात काही बर्फाचे तुकडे टाका आणि जिममध्ये जाण्यापूर्वी किंवा घरी व्यायाम करण्यापूर्वी ते प्या. हे प्यायल्याने तुम्हाला जबरदस्त ताकद मिळेल आणि तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल.
हे ही वाचा : चश्मा लावण्याची गरजच राहणार नाही, दुधात मिक्स करून 'ही' पावडर खा, यासाठी किचनमधील 4 वस्तू आहेत आवश्यक!
हे ही वाचा : झोपेचा भावनांशी थेट असतो संबंध, झोपण्यापूर्वी हे काम करा, नेहमी रहाल आनंदी अन् फ्रेश
