TRENDING:

जेवणानंतर खा 'हा' पदार्थ, पोट आपोआप होईल हलकं, गॅसचा होणार नाही त्रास!

Last Updated:

आहार कितीही सकस असला तरी अनेकजणांना गॅस होणे, अपचन होणे, पोट फुगणे, इत्यादी विविध त्रासाचा सामना करावा लागतो. एकदा पोट बिघडलं की पूर्ण दिवस वाया जातो. त्यामुळे आज आपण पचनसंस्था उत्तम व्हावी यासाठी एक रामबाण उपाय जाणून घेणार आहोत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अंजू प्रजापती, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

रामपूर : अन्नातून शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे पचनसंस्था उत्तम आणि भक्कम असणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे विविध आजारांपासून शरीराचं रक्षण होतं.

आहार कितीही सकस असला तरी अनेकजणांना गॅस होणे, अपचन होणे, पोट फुगणे, इत्यादी विविध त्रासाचा सामना करावा लागतो. एकदा पोट बिघडलं की पूर्ण दिवस वाया जातो. त्यामुळे आज आपण पचनसंस्था उत्तम व्हावी यासाठी एक रामबाण उपाय जाणून घेणार आहोत.

advertisement

आपल्या किचनमधले काही पदार्थ आयुर्वेदात अगदी अमृतसम मानले जातात. जिरं, ओवा, काळं मीठ, हिंग आणि बडीशेप, इत्यादी मिश्रणाची पावडर तर पोटासाठी अत्यंत फायदेशीर असते. यामुळे केवळ गॅसच्या त्रासावर आराम मिळत नाही, तर अपचनही दूर होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पचनसंस्थेचं कार्य उत्तम राहतं आणि खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचतं.

ही फायदेशीर पावडर अर्थात चूर्ण कसं बनवायचं पाहूया. सर्वात आधी जिरं, ओवा, काळं मीठ, हिंग आणि बडीशेप हलकी भाजून घ्यायची. मग हे मिश्रण बारीक वाटायचं. त्यानंतर एका बंद डब्यात ठेवायचं. दररोज जेवणानंतर 15 मिनिटांनी ही पावडर अर्धा किंवा चमचाभर हळूहळू चाटून खायची. त्यावर कोमट पाणी प्यायचं. यामुळे कोणतेही पदार्थ जलद आणि व्यवस्थित पचतात. जिऱ्यामुळे पोटात गॅस तयार होण्याचं प्रमाण कमी होतं. तर, ओव्यामुळे पोटदुखीवर, अपचनावर आराम मिळतो. काळं मीठ गॅस आणि ॲसिडिटी रोखतं. परिणामी पोट फुलण्याच्या समस्येवरही आराम मिळतो. तसंच मेटाबॉलिज्म सुधारतं, पोट हलकं वाटतं, पोटदुखी आणि पोटात होणाऱ्या जळजळीवर आराम मिळतो. महत्त्वाचं म्हणजे अन्नपचन सुरळीत होतं आणि पोटाशी संबंधित सर्व विकारांवर कायमचा आराम मिळतो.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
जेवणानंतर खा 'हा' पदार्थ, पोट आपोआप होईल हलकं, गॅसचा होणार नाही त्रास!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल