TRENDING:

Summer Care : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टिप्स, घरगुती उपायांची होईल मदत

Last Updated:

उन्हाळ्यात त्वचेची काळजी आणि लक्ष देण्याची गरज असते. यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत. या समस्या लहान असल्या तरी वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात त्या गंभीर होऊ शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळा म्हणजे कडक ऊन आणि घाम...तापमान वाढलं की त्वचेवर या वाढलेल्या तापमानाच्या खुणा दिसायला सुरुवात होते. यापैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे पुरळ, अंगावर उठणारं पित्त आणि त्वचेची जळजळ.
News18
News18
advertisement

उन्हाळ्यात त्वचेवर येणारं पुरळ घरगुती उपाय वापरुन कमी करता येईल. उन्हाळ्यात त्वचेची काळजी आणि लक्ष देण्याची गरज असते. यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत. या समस्या लहान असल्या तरी वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात त्या गंभीर होऊ शकतात.

Summer Care : उन्हाळ्यात हे रंगीबेरंगी पदार्थ खा, निरोगी राहा

advertisement

बऱ्याचदा घाम पूर्णपणे बाहेर येऊ शकत नाही आणि त्वचेच्या आत जमा होतो, ज्यामुळे त्वचेवर लाल पुरळ, जळजळ होते आणि खाज सुटते.

पुरळ म्हणजे काय?

उन्हाळ्यात, शरीरातून जास्त घाम बाहेर पडतो आणि घाम नीट सुकत नाही, तेव्हा त्वचेची छिद्र बंद होतात. यामुळे घाम आत अडकतो आणि त्या ठिकाणी जळजळ, लालसरपणा आणि पुरळ उठतात. तीव्र सूर्यप्रकाश, गरम वारा आणि दमट हवामानामुळे ही समस्या वाढते. अतिनील किरणांमुळे त्वचेचं नुकसान होतं. यामुळे सनबर्न तसंच लाल पुरळ आणि सूज यासारख्या समस्या उद्भवू शकतात; संवेदनशील त्वचा असलेल्यांना या समस्या अधिक जाणवतात.

advertisement

अंगावर पित्त का उठतं ?

अंगावर पित्तामुळे होणाऱ्या गाठी हा देखील एक प्रकारचा त्वचारोग आहे. ज्यामध्ये शरीरावर अचानक लाल रेषा उठतात किंवा पुरळ उठतं. यामुळे खाज येते आणि काही काळानंतर ते कमी होतं. कधीकधी हे एलर्जीमुळे होते, उष्णता, घाम, काही अन्नपदार्थांची एलर्जी किंवा धूळ आणि घाम.

Summer Care : दही खा, तंदुरुस्त राहा, उन्हाळ्यासाठी आरोग्यकारक, आल्हाददायक पदार्थ 

advertisement

उष्णतेमुळे होणारे पुरळ दूर करण्यासाठी घरगुती उपाय

1. थंड पाण्याचा वापर: दिवसातून दोनदा थंड पाण्यानं आंघोळ केल्यानं त्वचा थंड होते आणि घामाचा चिकटपणा कमी होतो.

2. चंदन आणि मुलतानी माती वापरल्यानं त्वचेला थंडावा मिळतो आणि जळजळ कमी होते.

3. कडुनिंबाचा वापर : कडुनिंबातील गुणधर्मांमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात. कडुनिंबाची पानं पाण्यात टाकून आंघोळ केल्यानं पुरळ आणि अंगावर उठणाऱ्या त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो.

advertisement

4. खोबरेल तेलाचा वापर: खाज आलेल्या जागेवर थोडंसं खोबरेल तेल लावल्यानं त्वचेला आर्द्रता मिळते आणि खाज कमी होते.

5. तीव्र सूर्यप्रकाश टाळा: घराबाहेर पडताना हलके आणि सैल कपडे घाला, टोपी घाला आणि शक्यतो तीव्र  सूर्यप्रकाश टाळा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टिप्स, घरगुती उपायांची होईल मदत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल