दात किडणं ही एक गंभीर समस्या आहे. वेळीच काळजी घेतली नाही तर दात किडणं आणि दात दुखणं असे त्रास जाणवू शकतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काही खाद्यपदार्थांमुळे दातांची ही समस्या आणखी वाढू शकते. त्यामुळे दात किडण्याची समस्या उद्भवते तेव्हा आहाराची विशेष काळजी घ्या.
दात किडत असताना हे पदार्थ खाणं टाळा -
advertisement
1. गोड आणि साखरेचे पदार्थ
साखरयुक्त पदार्थ जसं की चॉकलेट, मिठाई आणि गोड पेय यामुळे किड आणखी वाढते. साखरेमुळे बॅक्टेरिया फोफावतो. ज्यामुळे दात किडण्याचा वेग वाढतो. मिठाई खाणं आवश्यक असेल तर खाल्ल्यानंतर लगेच तोंड स्वच्छ धुवा आणि दात स्वच्छ करा.
2. सॉफ्ट ड्रिंक्स आणि सोडा
सॉफ्ट ड्रिंक्स आणि सोड्यामध्ये ॲसिड आणि साखर जास्त प्रमाणात असतं, ज्यामुळे दातावरच्या इनॅमलला धोका पोहचतो. यामुळे दात किडण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि कीड आणखी खोलवर जाऊ शकते. अशावेळी नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा हर्बल चहा पिणं हे पर्याय आहेत.
3. चिकट पदार्थ
चॉकलेट्स, चिकट कँडीज किंवा चिकट स्नॅक्स दातांना चिकटतात. हे बॅक्टेरियासाठी आवडतं खाद्य आहेत त्यामुळे दाताची किड वाढते. याऐवजी सफरचंद किंवा गाजर यांसारखी ताजी फळं खा, यामुळे दात स्वच्छ करण्यासाठी मदत होते.
4. लिंबूवर्गीय फळं
मोसंबी, लिंबू आणि लोणचं या सगळ्यात आम्लाचं प्रमाण जास्त असतं. यामुळे दातावरचा थर खराब होऊ शकतो आणि किड अधिक पसरु शकते. आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर तोंड पाण्यानं स्वच्छ धुवावं, जेणेकरून दातांवर ॲसिड जमा होणार नाही.
Tea Powder : चहा पत्तीपासून बनवा फेस स्क्रब, डेड स्किन काढण्यासाठी उपयुक्त
दातांसाठी या गोष्टी लक्षात ठेवा -
काहीही खाल्ल्यानंतर चूळ नक्की भरा.
दिवसातून किमान दोनदा ब्रश करा, दंतवैद्याच्या सल्ल्यानं फ्लॉसिंग वापरा.
दात संसर्गाच्या बाबतीत ताबडतोब दंतवैद्याचा सल्ला घ्या.
दातांची मजबुती आणि बॅक्टेरियापासून संरक्षणासाठी फ्लोराईड उपयुक्त आहे.
दात किडत असतील तर खाण्याच्या सवयींची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. मिठाई, शीतपेय, चिकट स्नॅक्स आणि आंबट फळं खाणं टाळा. योग्य काळजी घेतली तर दात किडणं टाळू शकता आणि मौखिक आरोग्य सुधारू शकता.