TRENDING:

Summer Drink : उन्हाळ्यासाठी गुणकारी नैसर्गिक पेय, वाचा कोरफडीच्या सरबताचे आरोग्यदायी फायदे

Last Updated:

कोरफडीचं सरबत अनेक गंभीर आजारांपासून आराम मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. पण उन्हाळ्यात याची उपयुक्तता आणखी महत्त्वाची आहे. शरीर हायड्रेट ठेवणं आणि त्वचा थंड ठेवणं या सरबतातल्या गुणधर्मांमुळे शक्य होतं. एरवीही आणि उन्हाळ्यात तुमच्या दिनचर्येत याचा समावेश केल्यानं शरीर निरोगी राहतं आणि रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मे महिना सुरु झाला म्हणजे उन्हाचं प्रमाण आणखी वाढणार. उन्हाळ्यात कोकम सरबत, पन्हं, लिंबू पाणी, नारळ पाणी प्यायलं जातं. तीव्र उन्हाळ्यामुळे होणाऱ्या डिहायड्रेशनचा त्रास यामुळे कमी होतो. या पर्यायांमध्ये आणखी एक पर्याय आहे कोरफडीच्या सरबताचा.
News18
News18
advertisement

कोरफडीचं सरबत अनेक गंभीर आजारांपासून आराम मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. पण उन्हाळ्यात याची उपयुक्तता आणखी महत्त्वाची आहे. शरीर हायड्रेट ठेवणं आणि त्वचा थंड ठेवणं या सरबतातल्या गुणधर्मांमुळे शक्य होतं. उन्हाळ्यात आणि एरवीही तुमच्या दिनचर्येत या सरबताचा समावेश केल्यानं शरीर निरोगी राहतं आणि रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.

Summer Health Care: उन्हाळ्यात युरिक ॲसिडचा त्रास कमी करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा, वेदना होतील कमी

advertisement

आयुर्वेदात कोरफडीला विशेष औषध मानलं जातं. कोरफडीच्या पानांपासून काढलेला रस शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे कोरफडीचं सरबत प्यायल्यानं शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. कोरफडीचं सरबत प्यायल्यानं होणारे फायदे पाहूयात.

1. पचनसंस्था मजबूत होते

गॅस, बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या दूर करण्यासाठी कोरफडीचं सरबत खूप प्रभावी आहे. यात असलेले नैसर्गिक घटक पचन सुधारतात आणि आतडी निरोगी ठेवतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 20-30 मिली कोरफडीचं सरबत प्यायल्यानं पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

advertisement

2. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त

कोरफडीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक उत्तम नैसर्गिक उपाय असू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोरफडीचं सरबत घ्यावं.

3. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

कोरफडीच्या सरबतामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि केसांची ताकद वाढते. यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेची जळजळ, मुरुमं येणं आणि केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. कोरफडीचा रस पिण्यासोबतच चेहरा आणि केसांनाही लावता येतो.

advertisement

4. हाडं आणि सांधेदुखीपासून आराम

कोरफडीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी घटक शरीरातील वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात. संधिवाताच्या रुग्णांसाठी हा एक नैसर्गिक उपाय ठरु शकतो. सकाळी कोरफडीचं सरबत पिणं आणि हलका व्यायाम केल्यानं हाडं मजबूत होतात.

Summer Face Pack : उन्हाळ्यासाठी बनवा खास समर फेस पॅक, उन्हाळ्यातही चेहरा दिसेल तजेलदार

advertisement

5. रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त

कोरफडीच्या रसामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यासाठी शक्य होतं. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे विषाणूजन्य संसर्ग, सर्दी आणि खोकला आणि इतर आजारांपासून बचाव करण्यास मदत होते. दररोज सकाळी कोरफडीचा रस प्यायल्यानं शरीर नैसर्गिकरित्या मजबूत होतं.

कोरफडीचं सरबत बनवण्याची कृती

कोरफडीची पानं कापून त्याचा गर काढा. ब्लेंडरमध्ये गर आणि पाणी घाला. हे मिश्रण व्यवस्थित गाळून घ्या आणि त्यात लिंबू किंवा मध घालून प्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Drink : उन्हाळ्यासाठी गुणकारी नैसर्गिक पेय, वाचा कोरफडीच्या सरबताचे आरोग्यदायी फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल