Summer Face Pack : उन्हाळ्यासाठी बनवा खास समर फेस पॅक, उन्हाळ्यातही चेहरा दिसेल तजेलदार
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
उन्हाळ्यात टॅनिंगमुळे चेहऱ्यावर मृत त्वचेच्या पेशी जमा होतात, चेहऱ्यावरची चमक कमी होते आणि चेहराही निस्तेज दिसतो. अशावेळी दही, डाळीचं पीठ, कोरफड, मध हे पदार्थ चेहऱ्यावर लावल्यानं उन्हाळ्यात त्वचेचं नुकसान कमी होईल.
मुंबई : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं अधिक गरजेचं आहे. या ऋतूत तीव्र सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर टॅनिंग होतं. टॅनिंगमुळे चेहऱ्यावर मृत त्वचेच्या पेशी जमा होतात, चेहऱ्यावरची चमक कमी होते आणि चेहराही निस्तेज दिसतो. अशावेळी दही, डाळीचं पीठ, कोरफड, मध हे पदार्थ चेहऱ्यावर लावल्यानं उन्हाळ्यात त्वचेचं नुकसान कमी होईल.
या नैसर्गिक पदार्थांमुळे चेहऱ्यावर फेशियल केल्यासारखी चमक येईल. घरी दही आणि डाळीच्या पिठापासून बनवलेला फेस पॅक लावल्यानं चेहऱ्यावरील टॅनिंगचा थर निघून टाकतो आणि त्वचा चमकदार होण्यासाठी मदत होते. उन्हाळ्यामुळे होणारं टॅनिंग आणि त्वचेवरचे काळे डाग दूर करण्यासाठी, हा फेस पॅक उपयोगी ठरतो. दही वापरुन बनवलेल्या फेस पॅकमुळे चेहऱ्यावर साचलेल्या धुळीचा थर निघतो आणि यामुळे त्वचेला हायड्रेशन देखील मिळतं.
advertisement
दही आणि डाळीच्या पिठाचा फेस पॅक
दही आणि डाळीचं पीठ वापरून चांगला फेस पॅक बनवता येतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी, आवश्यकतेनुसार दोन चमचे बेसन आणि दही मिसळा. हे मिश्रण एकजीव करा आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळ ठेवल्यानंतर चेहरा धुवा. या फेस पॅकमुळे टॅनिंगचं प्रमाण कमी होतं आणि चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी निघून जातात. हा पॅक चेहऱ्यावर तसंच मानेवर आणि घशावर लावा.
advertisement
दही आणि हळदीचा फेस पॅक
दही आणि हळद पावडर मिसळून हा फेस पॅक बनवला जातो. दोन चमचे दह्यात अर्धा चमचा हळद मिसळून पेस्ट तयार करा. दहा ते पंधरा मिनिटं चेहऱ्यावर लावल्यानंतर ते धुवून काढा. हा फेसपॅक जास्त वेळ लावू नका, अन्यथा चेहऱ्यावर पिवळेपणा येऊ शकतो. दाहक विरोधी आणि जीवाणूंच्या वाढीला प्रतिबंध करणारे गुणधर्म असल्यानं हा फेस पॅक त्वचेसाठी फायदेशीर ठरतो.
advertisement
दही आणि मध
दही आणि मध वापरुन तयार केलेल्या फेस पॅकमुळे चेहरा चमकदार होतो. यामुळे त्वचेला पुरेसा ओलावा देखील मिळतो. फेस पॅक बनवण्यासाठी, दही आणि मध समान प्रमाणात मिसळा आणि ते लावा. हा फेस पॅक विशेषतः कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी चांगला आहे.
advertisement
दही आणि कोरफड
त्वचेला थंडावा देण्यासाठी हा फेस पॅक परिणामकारक आहे. या फेसपॅकमुळे उन्हामुळे होणारं टॅनिंग कमी होऊ शकतं. यासाठी कोरफडीचा ताजा गर वापरू शकता किंवा दह्यात तयार कोरफडीचा गर मिसळू शकता. दही आणि कोरफड मिसळा, पंधरा मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 01, 2025 2:05 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Face Pack : उन्हाळ्यासाठी बनवा खास समर फेस पॅक, उन्हाळ्यातही चेहरा दिसेल तजेलदार