Summer Care : त्वचेच्या संरक्षणासाठी वापरा सनस्क्रीन लोशन, घरी झटपट लोशन बनवण्याची कृती
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
सनस्क्रीन लावल्यानं सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचं नुकसान होत नाही. यासाठी एक सनस्क्रीन लोशन घरीही बनवता येईल. यासाठी नारळाचा तेल हा महत्त्वाचा घटक आहे. नारळाचं तेल आणि कोरफड एकत्र करुन लावल्यानं त्वचेला थंडावा मिळतो आणि तीव्र उन्हापासून संरक्षण होतं.
मुंबई : शाळेच्या परीक्षा संपल्यात, आणि सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. हा मोसम आहे फिरण्याचा..भटकंतीचा.. पण ही भटकंती होते उन्हात..अशावेळी सनस्क्रीन लावलं तर चेहऱ्यावर तीव्र सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांचा परिणाम कमी होतो.
उन्हाळ्यात, सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर पडण्याची कल्पनाही करता येत नाही. सनस्क्रीन सूर्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचं रक्षण होतं. सनस्क्रीन लावल्यानं सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचं नुकसान होत नाही. यासाठी एक सनस्क्रीन लोशन घरीही बनवता येईल. यासाठी नारळाचा तेल हा महत्त्वाचा घटक आहे. नारळाचं तेल आणि कोरफड एकत्र करुन लावल्यानं त्वचेला थंडावा मिळतो आणि तीव्र उन्हापासून संरक्षण होतं.
advertisement
सनस्क्रीन लोशन कधी संपलं तर फक्त या दोन गोष्टी मिसळून घरी सनस्क्रीन बनवता येतं. सनस्क्रीन लावलं नाहीतर कडक उन्हामुळे त्वचेवर जळजळ होते, सनबर्न आणि टॅनिंग देखील होऊ शकतं.
सनस्क्रीन बनवण्याची कृती -
हे सनस्क्रीन बनवण्यासाठी, एका भांड्यात कोरफड आणि नारळ तेल एकत्र मिसळा. या मिश्रणाचा पोत खूप मऊ होईपर्यंत ते मिसळा. आता हे तयार मिश्रण सनस्क्रीन म्हणून लावता येईल. सनस्क्रीनचं योग्य प्रमाण लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. आवश्यकतेपेक्षा कमी सनस्क्रीन लावलं तर त्याचा त्वचेवर फारसा परिणाम होणार नाही आणि त्वचेचं नुकसान होईल.
advertisement
- घरात थेट खूप प्रकाश येत असेल तर त्वचेवर सनस्क्रीन लावणं खूप महत्वाचं आहे. विशेषतः उन्हात बाहेर जाण्यापूर्वी वीस मिनिटं आधी सनस्क्रीन लावावं.
- चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लावावं. यावर मेकअप करता येईल. बाहेर जास्त सूर्यप्रकाश नसला तरी सनस्क्रीन लावणं महत्त्वाचं आहे.
- त्वचेच्या संरक्षणासाठी फक्त चेहऱ्यावर सनस्क्रीन लावू नका, तर हात आणि पायांसाठीही सन प्रोटेक्शन लोशन लावा.
- उन्हात बाहेर जाणार असाल तर पूर्ण कपडे घालण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्वचेवर सूर्यप्रकाशाचा परिणाम कमी होईल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 30, 2025 5:53 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care : त्वचेच्या संरक्षणासाठी वापरा सनस्क्रीन लोशन, घरी झटपट लोशन बनवण्याची कृती