Summer Care : कडक उन्हाळा आणि गारेगार काकडी, उन्हाळा होईल सुसह्य, डोळे, केसांसाठीही फायदेशीर

Last Updated:

उन्हाळ्यात प्रकृती निरोगी ठेवायची असेल काकडी हा उत्तम पर्याय आहे. काकडीमुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होऊ शकते. कारण त्यात नव्वद टक्के पाणी असतं, यामुळे शरीराचं डिहायड्रेशनमुळे होणारं नुकसान कमी होतं.

News18
News18
मुंबई : उन्हाळा सुसह्य करायचा असेल तर पुरेसं पाणी पिणं तर आवश्यक आहेच तसंच सोबतीला पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं - भाज्या खाणं पण आवश्यक आहे. उन्हाळ्यात प्रकृती निरोगी ठेवायची असेल काकडी हा उत्तम पर्याय आहे.
उन्हाळ्याच्या मोसमात अनेक भाज्या आणि फळं उपलब्ध असतात, ज्यामुळे कडक उन्हापासून होणारं नुकसान रोखण्यास मदत होते. काकडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. काकडीमुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होऊ शकते. कारण त्यात नव्वद टक्के पाणी असतं, यामुळे शरीराचं डिहायड्रेशनमुळे होणारं नुकसान कमी होतं, काकडीत असलेलं फायबर, जीवनसत्त्वं, कॅल्शियम, आयोडीन, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम सारखे घटक उपयुक्त आहेत.
advertisement
काकडी खाण्याचे फायदे
1. पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी उपयुक्त -
काकडीमध्ये नव्वद टक्के पाणी असल्यानं काकडी खाल्ल्यानं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होतो. कारण काकडीत इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण चांगलं असतं. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी दररोज काकडी खाऊ शकता.
advertisement
2. पचनासाठी उपयुक्त -
पित्त विकारामुळे होणारे आजार बरे करण्यासाठी काकडी उपयुक्त आहे. काकडीमुळे पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठता,आम्लपित्त,छातीत होणारी जळजळ आणि गॅस्ट्रोसारख्या समस्या टाळता येतात.
3. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त -
वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काकडीचा समावेश करू शकता. काकडीत फायबर आणि पाणी मुबलक प्रमाणात आढळतं. कॅलरीज खूप कमी असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
advertisement
4. डोळ्यांसाठी उपयुक्त -
काकडीमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं, दृष्टी सुधारण्यासाठी काकडी उपयुक्त आहे.आहारात काकडीचा समावेश करून डोळे निरोगी ठेवता येतात.
5. केसांसाठी फायदेशीर -
केसांच्या वाढीसाठी काकडीचं नियमित सेवन चांगलं मानलं जातं. काकडीचा रस गाजर आणि पालकाच्या रसात मिसळून प्यायल्यानं केस लांब, चमकदार आणि मऊ होतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care : कडक उन्हाळा आणि गारेगार काकडी, उन्हाळा होईल सुसह्य, डोळे, केसांसाठीही फायदेशीर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement