दम्यासारख्या आजारावर सीताफळ फायद्याचे
सीताफळामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सर्वात जास्त प्रमाणामध्ये असते. पोटॅशियम 10 टक्के आणि मॅग्नेशियम 6 टक्के असते. हाडांकरिता जे आवश्यक आहे ते पोषकतत्व सीताफळामध्ये आहेत. शरीरातील कमकुवतपणा सीताफळ दूर करते. बद्धकोष्ठता आणि दम्यासारख्या समस्या देखील सीताफळामुळे दूर होतात. विटामिन बी 6 सर्वात जास्त प्रमाणामध्ये असते आणि एका सीताफळामध्ये प्रथिने 1.6, स्निग्ध 1.4, खनिजे 0.9, कर्बोदके 23.5, कॅलरीज एकूण 104, कॅल्शियम17, लोह 4.31 जीवनसत्त्व B2. 0.7 जीवनसत्व B1 0.17 आणि जीवनसत्त्वे 1.3 एकूण 37 टक्के आपल्याला सिताफळ मधून मिळते, असेही आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
हिरवी मिरची टाकून कधी बीट खाल्लंय का? मग ही रेसिपी पाहाच Video
सीताफळात हे आहेत पोषक घटक
गरोदर महिलांसाठी हे फळ फायदेशीर आहे आणि सर्वांसाठी शरीरातील स्नायूंसाठी फायदेशीर आहेत. सोबतच डोळ्यांसाठी देखील सीताफळ फायद्याचे आहे. त्वचेसाठी सुद्धा आवश्यक आहे. सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व आढळतात. तसेच त्यात आर्द्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. सीताफळ हे पित्तनाशक आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकरिता सीताफळाची आवश्यकता असते, असे देखील आहारतज्ज्ञ प्रा. रेणुका रपाटे सांगतात.
सीताफळाचे अतिसेवन त्रासदायक
सीताफळाचे अतिप्रमाणात सेवन केल्याने त्याचे तोटे देखील जाणवू शकतात. त्यामुळे सीताफळ कोणासाठी धोकादायक ठरू शकते तर सीताफळामध्ये फायबरचं प्रमाण असल्यामुळे अति प्रमाणात सेवन केल्याने अंगावर सूजही येऊ शकते. हगवण लागू शकते. सोबतच मधुमेहाच्या रुग्णांनी सीताफळ खाणे टाळावे, असा सल्ला देखील आहार तज्ज्ञ देतात.