उन्हाळ्याच्या मोसमात अनेक भाज्या आणि फळं उपलब्ध असतात, ज्यामुळे कडक उन्हापासून होणारं नुकसान रोखण्यास मदत होते. काकडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. काकडीमुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होऊ शकते. कारण त्यात नव्वद टक्के पाणी असतं, यामुळे शरीराचं डिहायड्रेशनमुळे होणारं नुकसान कमी होतं, काकडीत असलेलं फायबर, जीवनसत्त्वं, कॅल्शियम, आयोडीन, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम सारखे घटक उपयुक्त आहेत.
advertisement
Summer Care : त्वचेच्या संरक्षणासाठी वापरा सनस्क्रीन लोशन, घरी झटपट लोशन बनवण्याची कृती
काकडी खाण्याचे फायदे
1. पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी उपयुक्त -
काकडीमध्ये नव्वद टक्के पाणी असल्यानं काकडी खाल्ल्यानं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होतो. कारण काकडीत इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण चांगलं असतं. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी दररोज काकडी खाऊ शकता.
2. पचनासाठी उपयुक्त -
पित्त विकारामुळे होणारे आजार बरे करण्यासाठी काकडी उपयुक्त आहे. काकडीमुळे पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठता,आम्लपित्त,छातीत होणारी जळजळ आणि गॅस्ट्रोसारख्या समस्या टाळता येतात.
3. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त -
वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काकडीचा समावेश करू शकता. काकडीत फायबर आणि पाणी मुबलक प्रमाणात आढळतं. कॅलरीज खूप कमी असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
Summer Care : उन्हाळ्यासाठी खास पेय, हायड्रेटेड राहण्यासाठी उपयुक्त, उन्हाळा होईल सुसह्य
4. डोळ्यांसाठी उपयुक्त -
काकडीमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं, दृष्टी सुधारण्यासाठी काकडी उपयुक्त आहे.आहारात काकडीचा समावेश करून डोळे निरोगी ठेवता येतात.
5. केसांसाठी फायदेशीर -
केसांच्या वाढीसाठी काकडीचं नियमित सेवन चांगलं मानलं जातं. काकडीचा रस गाजर आणि पालकाच्या रसात मिसळून प्यायल्यानं केस लांब, चमकदार आणि मऊ होतात.