TRENDING:

Summer Care : दही खा, तंदुरुस्त राहा, उन्हाळ्यासाठी आरोग्यकारक, आल्हाददायक पदार्थ 

Last Updated:

एरवी दही खाणं आणि उन्हाळ्यात दही खाणं याला महत्त्व आहे. उन्हाळ्यात दही खाण्याची लज्जत वेगळी. दही चविष्ट तर असतंच, तसंच ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतं. दह्यात प्रथिनं, कॅल्शियम, प्रोबायोटिक्स आणि अनेक आवश्यक पोषक तत्वं भरपूर प्रमाणात असतात, या सर्व घटकांचा शरीर आतून मजबूत करण्यास उपयोग होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दही हा भारतीय स्वयंपाकातला अविभाज्य घटक. एरवी दही खाणं आणि उन्हाळ्यात दही खाणं याला महत्त्व आहे. उन्हाळ्यात दही खाण्याची लज्जत वेगळी. दही चविष्ट तर असतंच, तसंच ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतं. दह्यात प्रथिनं, कॅल्शियम, प्रोबायोटिक्स आणि अनेक आवश्यक पोषक तत्वं भरपूर प्रमाणात असतात, या सर्व घटकांचा शरीर आतून मजबूत करण्यास उपयोग होतो.
News18
News18
advertisement

एक वाटी दही खाल्ल्यानं दैनंदिन कॅल्शियमच्या गरजेची जवळजवळ निम्मी गरज पूर्ण होऊ शकते. याशिवाय, त्यात इतर अनेक आवश्यक पोषक घटक देखील आढळतात.

Summer Care: डिहायड्रेशननं पडू नका आजारी, उन्हाळ्यात अशी घ्या काळजी

दररोज दही खाल्ल्यानं पचनसंस्था निरोगी राहतेच, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठीदेखील दही प्रभावी आहे.

advertisement

दररोज दही का खावं -

पोषक तत्वांची कमतरता भरुन निघते -

शरीराला आवश्यक असलेले जवळजवळ सर्व पोषक घटक दह्यात असतात. एक वाटी दही तुमच्या दैनंदिन कॅल्शियमची गरज 49% भागवू शकते.

दह्यात व्हिटॅमिन बी 12, रिबोफ्लेविन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखी खनिजं देखील असतात, यामुळे हाडं मजबूत करण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि चयापचय सुधारण्यासाठी मदत होते.

advertisement

प्रथिनांचा चांगला स्रोत -

दह्यात प्रथिनं मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात आणि भूक नियंत्रित करण्यास मदत होते. ग्रीक योगर्टमधे हे प्रमाण आणखी जास्त असतं, यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि कॅलरीज बर्न करण्यासाठी मदत होते.

पचनसंस्था चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त -

दह्यात असलेले प्रोबायोटिक्स म्हणजेच जिवंत बॅक्टेरिया पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. चांगले बॅक्टेरिया आतड्यांमध्ये जातात आणि अन्न पचवण्यासाठी आणि बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. IBS म्हणजेच इरिटेबल बोवेल सिंड्रोम असलेल्या रुग्णांना दही खाण्याचा खूप फायदा होऊ शकतो.

advertisement

Summer Care : उन्हाळ्यात आहारात भेंडी नक्की खा, हे आहेत भेंडीचे आरोग्यदायी फायदे

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त -

दह्यात असलेले प्रोबायोटिक्स, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि झिंक या सारख्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. नियमित दही खाल्ल्यानं सर्दीसारख्या आजारांपासून बचाव होतो. व्हिटॅमिन डीनं समृद्ध असलेलं दही रोगप्रतिकारक शक्तीसाठी आणखी फायदेशीर आहे.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर -

advertisement

दह्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं, पण संशोधनातून समोर आलेल्या निरीक्षणानुसार, दुधापासून बनवलेलं फॅट फास्ट फूडमधून मिळणाऱ्या फॅटइतकं नुकसानकारक नसतं. दही खाल्ल्यानं चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) वाढतं आणि रक्तदाब नियंत्रित होतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care : दही खा, तंदुरुस्त राहा, उन्हाळ्यासाठी आरोग्यकारक, आल्हाददायक पदार्थ 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल