Summer Care : उन्हाळ्यात आहारात भेंडी नक्की खा, हे आहेत भेंडीचे आरोग्यदायी फायदे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
पचायला सोपी आणि थंडावा देणारी असल्यानं, उन्हाळ्याच्या हंगामासाठीं सर्वोत्तम भाज्यांच्या यादीत भेंडीचा नंबर लागतो. भेंडीमध्ये फायबर, जीवनसत्त्व अ, क आणि पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजं तसंच अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
मुंबई : उन्हाळ्यातल्या गरम हवेमुळे पचनाला हलकं अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या रोजच्या आहारातली एक भाजी म्हणजे भेंडी पचायलाही सोपी आहे आणि या भाजीमुळे थंडावाही मिळतो. भेंडी चविष्ट आहे तसंच यात अनेक पोषक घटकही आहेत.
पचायला सोपी आणि थंडावा देणारी असल्यानं, उन्हाळ्याच्या हंगामासाठीं सर्वोत्तम भाज्यांच्या यादीत भेंडीचा नंबर लागतो. भेंडीमध्ये फायबर, जीवनसत्त्व अ, क आणि पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजं तसंच अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
भेंडी मुख्यतः उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात पिकवली जाते. भेंडीची भाजी आहारात तर असतेच शिवाय शेंगांचा अर्क अनेक सूप आणि सॉस घट्ट करण्यासाठी वापरला जातो.
advertisement
भेंडीचे आरोग्यदायी फायदे -
- भेंडी खाल्ल्यानं पचनसंस्था मजबूत होते आणि अनेक समस्या दूर होण्यासोबतच आरोग्यही चांगलं राहतं. त्यात व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात.
- सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह आणि जस्त यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या भेंडीचा थंडावा वाढतो. भेंडीमध्ये प्रथिनं, जीवनसत्त्वं, मॅग्नेशियम, फायबर तसेच अँटीऑक्सिडंट्ससह इतर पोषक घटक आढळतात. भेंडीचं पाणी प्यायल्यानं पोट थंड राहतं.
advertisement
- भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आहे. त्यामुळे पचनसंस्था मजबूत करण्यासोबतच पोटाशी संबंधित सर्व समस्या देखील यामुळे दूर होतात. बद्धकोष्ठता, पोट फुगणं यासारख्या समस्यांपासून यामुळे आराम मिळतो. पोटासोबतच भेंडी हृदयासाठीही फायदेशीर आहे.
भेंडीमुळे कोलेस्टेरॉलची समस्या कमी व्हायला मदत होते आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. मधुमेह असेल तर भेंडी नक्की खा. त्यात ग्लायसेमिक नावाचा घटक आढळतो, ज्यामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. भेंडीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2025 8:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care : उन्हाळ्यात आहारात भेंडी नक्की खा, हे आहेत भेंडीचे आरोग्यदायी फायदे