या भाज्यांच्या सालीमध्ये फायबर म्हणजेच तंतूंचं प्रमाण, जीवनसत्त्व, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, हे सर्व घटक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. जर या भाज्या व्यवस्थित धुऊन खाल्ल्या तर या भाज्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या ठरू शकतात.
1. काकडी
काकडीच्या सालीत व्हिटॅमिन-के, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर सारखे घटक असतात. ते सालीसोबत खाऊ शकता.
advertisement
Lifestyle : जीवनातले उद्देश स्पष्ट ठेवा, जगणं होईल सुकर, जपानी नागरिकांची पंचसूत्री येईल कामी
2. गाजर-
गाजराची साल खूप पातळ असते आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. त्यात फायबर आणि व्हिटॅमिन सी सोबत बीटा-कॅरोटीन असतं, पचनसंस्था आणि त्वचा दोन्हीसाठी गाजर फायदेशीर मानलं जातं. सॅलडमधेही सालीसह गाजर खाऊ शकता.
3. टोमॅटो
टोमॅटोच्या सालीत लाइकोपीन मुबलक प्रमाणात असतं, हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी याचा उपयोग होतो.
केमिकल्सला करा बाय-बाय! वापरून पाहा 'या' DIY स्किनकेअर टिप्स, त्वचा होईल मऊ अन् चमकदार!
4. कारलं
कारल्याची सालीत फायबर, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि यकृताला विषमुक्त करण्यासाठी याची मदत होते. कारलं पूर्णपणे धुऊन आणि मीठ लावून सालासह खाणं फायदेशीर ठरू शकतं.
5. बटाटा
बटाट्याच्या सालीत लोह, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. विशेषतः जर बटाटे सालींसह उकळून किंवा भाजून खाल्ले तर त्याची चव आणि फायदे आणखी वाढू शकतात.