काळ्याभोर केसांसाठी टिप्स -
1. आवळा - आवळा केसांसाठी वरदान आहे. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. आवळ्याच्या नियमित वापरानं केसांच्या मुळांना पोषण मिळतं. आवळा पावडर पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि केसांना लावा. केस नैसर्गिकरित्या काळे ठेवण्यास यामुळे मदत होते.
Fruits : बद्धकोष्ठता टाळण्यासाठी करा फलाहार, पचन होईल सुलभ आणि पोट राहिल स्वच्छ
advertisement
2. कांद्याचा रस - कांद्याच्या रसामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केस पांढरे होण्याची समस्या कमी होते.रस केसांच्या मुळांवर लावा आणि काही तास तसंच राहू द्या. नियमित वापरानं केसांचा रंग नैसर्गिकरित्या काळा राहतो.
3. कढीपत्ता आणि खोबरेल तेल मिश्रण - कढीपत्ता नारळाच्या तेलात उकळा, मिश्रण थंड होऊ द्या आणि केसांना लावा. कढीपत्त्यात असलेले बीटा-कॅरोटीन आणि प्रथिन केसांना मजबूत आणि काळे करण्यास मदत करतात. आठवड्यातून दोनदा ते वापरा.
Intestine : आतडी स्वच्छ ठेवण्यासाठीचे उपाय, पचनाच्या तक्रारी होतील दूर
4. मेथी आणि दह्याचा मास्क - मेथीचे दाणे आणि दही मिसळून केसांच्या मुळांवर लावा. मेथीमुळे केसांच्या वाढीला गती मिळते आणि केस पांढरे होण्याची समस्या कमी होते. यामुळे केस चमकदार आणि काळे ठेवण्यास मदत होते.
5. ताण टाळा आणि संतुलित आहार घ्या - केस पांढरे होण्याचे प्रमुख कारण म्हणजे ताण. यासाठी ध्यान आणि योगाचा सराव करा. तसंच, आहारात प्रथिनं, जीवनसत्त्व आणि खनिजं असलेले पदार्थ समाविष्ट करा. यामुळे केसांना आतून पोषण मिळतं.
केसांना काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी, योग्य काळजी आणि पोषण खूप महत्वाचं आहे. योग्य उपाय नियमित केल्यानं केस नैसर्गिकरित्या काळे राहतील.