TRENDING:

Tanning : टॅनिंग घालवण्यासाठी खास टिप्स, घरी बनवलेले पॅक ठरतील उपयोगी

Last Updated:

उन्हामुळे त्वचेवर काळेपणा येतो. यामुळे पाय स्वच्छ असले तरी अस्वच्छ वाटू शकतात. अशा परिस्थितीत टॅनिंग कमी करण्यासाठी, बाजारातून केमिकल क्रीम खरेदी करण्याऐवजी, घरी काही घरगुती उपाय करता येतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचा टॅन होते आणि त्वचेवर डाग दिसतात. उन्हाळ्यात तुमच्याही पायांवर चप्पलचे डाग पडले असतील तर काही टिप्सचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. पाय उन्हामुळे जास्त टॅन झाले असतील, काही घरगुती वस्तूंचा वापर करुन टॅनिंग कमी करता येईल. हे उपाय वापरायला सोपे आहेत.
News18
News18
advertisement

उन्हाळ्यात, बूट घालून बाहेर जाणं कठीण असतं. चप्पल घालून बाहेर गेलात तर पाय टॅन होतात. उन्हामुळे त्वचा जळते तेव्हा पायांवर काळेपणा येतो. यामुळे पाय स्वच्छ असले तरी अस्वच्छ वाटू शकतात. अशा परिस्थितीत टॅनिंग कमी करण्यासाठी, बाजारातून केमिकल क्रीम खरेदी करण्याऐवजी, तुम्ही घरी काही घरगुती उपाय करून पाहू शकता.

Ice Massage : चेहऱ्यावर बर्फानं करा मसाज, उन्हाळ्यात चेहरा ठेवा ठंडा ठंडा कुल कुल

advertisement

पाय टॅनिंग करण्यासाठी घरगुती उपाय

पायांवरील टॅनिंग दूर करण्यासाठी, एक पॅक वापरून पाहता येईल. हा पॅक वापरून पाहण्यासाठी, एक चमचा टूथपेस्ट घ्या आणि त्यात एक चमचा कॉफी मिसळा. त्यात बेकिंग सोडा घाला आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या. हे सर्व व्यवस्थित मिसळा आणि पायांना लावा आणि टूथब्रशच्या मदतीनं पाय चांगले घासून घ्या. हा पॅक हातांनाही लावता येतो. यामुळे टॅनिंग निघून जातं.

advertisement

टॅनिंग दूर करण्यासाठी इतर घरगुती उपाय

  • टॅनिंग घालवण्यासाठी घरी उपलब्ध असलेल्या इतर गोष्टींचा वापर करता येईल. बेसन दह्यामध्ये मिसळून टॅन झालेल्या भागावर लावलं आणि 15 ते 20 मिनिटांनी धुवून टाकलं तर टॅनिंग कमी होण्यास मदत होईल.
  • बेसन आणि दही चांगले एक्सफोलिएटर म्हणून काम करतात.

  • लिंबाचा रस मधात मिसळून लावल्यामुळेही टॅनिंग कमी करता येईल. यामुळे त्वचेला व्हिटॅमिन सी, ब्लीचिंग गुणधर्म आणि दाहक-विरोधी गुणधर्म मिळतात, ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते.
  • advertisement

Homemade Facewash : घरगुती फेसवॉशनं घ्या चेहऱ्याची काळजी, त्वचा होईल स्वच्छ आणि मुलायम

  • टोमॅटोच्या रसात असलेला लायकोपिन हा घटक नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करतो. म्हणूनच जर टोमॅटोचा रस टॅनिंग झालेल्या भागावर लावला तर त्वचेचं नुकसान कमी होतं, उन्हामुळे लाल झालेली त्वचा बरी होते आणि त्वचेतील मृत पेशी देखील निघून जातात.
  • advertisement

  • कच्ची पपई हात आणि पायांना चोळली तर त्वचेच्या मृत पेशी निघून त्वचेवर चमक येते आणि त्वचा मऊ देखील होते.
  • दह्यामध्ये हळद मिसळल्यानं टॅनिंग कमी होऊ शकतं. त्वचेवर वीस मिनिटं लावल्यानंतर व्यवस्थित धुवा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Tanning : टॅनिंग घालवण्यासाठी खास टिप्स, घरी बनवलेले पॅक ठरतील उपयोगी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल