दिल्ली : गर्भधारणेचा काळ हा महिलांसाठी आनंदासह आव्हानांचाही असतो. कारण या दरम्यान, महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यामुळे त्यांची तब्येत खराब होऊ शकते. अशावेळी या सर्व त्रासातून बचावण्यासाठी जास्त करुन डॉक्टर महिला या गर्भधारणेदरम्यान, फिजिकली अॅक्टिव्ह राहण्याचा सल्ला देतात. कारण असे केल्याने अनेक समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो.
गर्भवती असताना डॉक्टर आपल्याला तुम्हाला जास्त हेवी व्यायाम करण्याचा सल्ला देत नाहीत. यावेळी महिला फक्त वॉकिंग करुन आरोग्यदायी राहू शकतात. याबाबत गायनेकोलॉजिस्ट स्पेशलिस्ट यांनी माहिती दिली. त्यामुळे गर्भवती महिलांनी किती वेळ वॉकिंग करावी, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेऊयात.
advertisement
साउथ दिल्लीमधील एलांटिस हेल्थकेयर हॉस्पिटल आहे. हे दिल्लीतील पहिल्या क्रमांकाचे खासगी हॉस्पिटल मानले जाते. या हॉस्पिटलमधील गायनेकोलॉजिस्ट स्पेशलिस्ट डॉ. मनन गुप्ता यांनी लोकल18 च्या टीमशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, त्यांनी दिल्ली येथील मौलाना आजाद मेडिकल कॉलेजमधून गायनेकोलॉजिस्ट या विषयात MBBS आणि MD चे शिक्षण घेतले आहे. तसेच जर्मनी येथून लेप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये कोर्स केला आहे. यानंतर मागील 10 वर्षांपासून ते याचा उपचार करत आहेत.
डॉ. मनन गुप्ता यांनी यावेळी सांगितले की, महिलांनी सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या काळात जास्त व्यायाम आणि वॉकिंग करु नये. महिलांनी या काळात खूप काळजी घेण्याची गरज आहे. जास्त वॉक केल्याने मिसकॅरेजचा धोका आहे. तसेच चौथ्या ते सहाव्या महिन्यापर्यंत महिलांना 30 मिनट सकाळी आणि 30 मिनिट सायंकाळी वॉक करायला हवा. सहाव्या ते नवव्या महिन्यांपासून महिलांना पुन्हा सावधानी घ्यायची गरज आहे. तसेच जास्त व्यायाम आणि वॉक अजिबात करू नये. अन्यथा वेळेच्या आधी प्रसूती होण्याची शक्यता आहे.
वजन कमी करायचंय? तर मग आता 7 दिवसातच 5 किलो वजन होणार कमी, फायदाच फायदा!
वॉक करण्याचे फायदे -
डॉ. मनन गुप्ता यांनी सांगितले की, वॉक केल्याने महिलांच्या नॉर्मल प्रसूतीची शक्यता खूप वाढते. त्यामुळे मुलाचे वजनही नियंत्रणात राहते. वजन वाढल्याने गर्भधारणेदरम्यान मधुमेह, ॲनिमिया इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान महिलांनी अॅक्टिव्ह राहणे आणि चालणे चांगले आहे, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.
सूचना : वर दिलेली माहिती ही तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. कोणतेही औषधी वगैरे वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.