TRENDING:

उन्हाचा तडाखा आणि धुळीकणाचा विळखा, कोल्हापूरकर त्रस्त, अशी राखा डोळ्यांची निगा Video

Last Updated:

एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे धुळीकणाचा विळखा असल्यामुळे कोल्हापूरकरांना आता नेत्रविकार जडू लागले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

कोल्हापूर : कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीनंतर हाती घेण्यात आलेल्या आणि प्रचंड चर्चेचा विषय ठरलेल्या रस्त्यांच्या विकासकामाला अखेर सुरुवात झाली. एकीकडे ही बाब कोल्हापूरकरांसाठी आनंददायी असली तरी त्याचा नकारात्मक मुद्दा काही प्रमाणात कोल्हापूरकरांना सोसावा लागतोय. कोल्हापूरकरांना सध्या रस्त्यांच्या विकास कामामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात धुळीचा सामना करावा लागत आहे. हवेतील धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे श्वसनाच्या संसर्गाच्या विकारासोबतच आता डोळ्यांचे विकारही कोल्हापूरकरांना जडू लागले आहेत. एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे धुळीकणाचा विळखा असल्यामुळे कोल्हापूरकरांना आता नेत्रविकार जडू लागले आहेत. हवेतील धुळीकणांमुळे डोळ्यावर कोणता प्रभाव पडू शकतो? या संदर्भात लोकल 18 ने कोल्हापुरातील नेत्रोपचार तज्ज्ञ डॉक्टर ऋचा पाटील यांच्याशी विशेष संवाद साधलाय पाहुयात.

advertisement

कोल्हापूर शहरात सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या विकासकामामुळे नागरिकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यातच कडक उन्हाळ्यामुळे या त्रासात अधिकच भर पडली आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर सध्या काँक्रीटीकरण आणि डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. ही धूळ नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये शिरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या लोकांना या धुळीचा अधिक त्रास होत आहे.

advertisement

त्वचेच्या रक्षणासाठी उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरताय? लावण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा Video

कशी राखाल निगा?

दिवसभरातून किमान एक वेळ डोळे थंड पाण्याने धुवावे. यामुळे डोळ्यांतील धुळीचे कण निघण्यास मदत होते.

बाहेर फिरताना चष्म्याचा वापर करावा

त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांत टाकण्यासाठी ड्रॉप घ्यावेत. हवेत धुळीकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येणाऱ्या अनेक रुग्णांमध्ये धुळीमुळे होणारे डोळ्यांचे आजार दिसून येत आहेत. डोळे लाल होणे, जळजळ होणे, खाज येणे यांसारख्या अनेक समस्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. यासाठी थंड पाण्याने डोळे स्वच्छ करीत राहावे. कोल्हापूर महानगरपालिकेने या समस्येची दखल घेतली आहे. रस्त्यांवर पाणी मारणे आणि धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी इतर उपाययोजना केल्या जात आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

advertisement

हवेतील धूलिकण डोळ्यांत जाऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या काळजीच्या गोष्टी घेणं अत्यंत आवश्यक आहे:

चष्म्याचा वापर : बाहेर जाताना गॉगल्स घालावेत. यामुळे डोळ्यांच्या संरक्षणासाठी धुळीचे कण डोळ्यात जाऊ शकत नाहीत.

डोळ्यांना कमी स्पर्श करा : हवेतील धुळीच्या कणांमुळे डोळ्यात जळजळ किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नये आणि हात स्वच्छ ठेवावेत.

advertisement

धुळीपासून बचाव : जर तुम्ही बाहेर जात असाल, तर शक्यतो धुळीच्या ठिकाणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. घरात आल्यावर चेहरा आणि डोळे धुवावेत. जर धुळीच्या प्रमाणात वाढ होत असेल, तर ऑईल गॉगल्स घालून देखील डोळ्यांची सुरक्षा केली जाऊ शकते.

डोळ्यांना विश्रांती द्या : कमी धुलीच्या भागात बसून डोळ्यांना विश्रांती द्यायला हवं, खासकरून जास्त वेळेपर्यंत धुळीच्या संपर्कात राहिल्यास डोळ्यांना आराम देणं महत्वाचं आहे.

नेत्रतज्ज्ञाचा सल्ला : धुळीमुळे डोळ्यात जळजळ किंवा इन्फेक्शनची समस्या आल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

ही काळजी घेतल्यास धुळीच्या कणांमुळे होणाऱ्या समस्यांपासून बचाव होऊ शकतो, असं डॉक्टर ऋचा पाटील सांगतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाचा तडाखा आणि धुळीकणाचा विळखा, कोल्हापूरकर त्रस्त, अशी राखा डोळ्यांची निगा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल