सोलापूर : सोलापूरमध्ये तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेने सोलापूरकर चांगलेच हैराण झालेले बघायला मिळत आहेत. जवळपास 40 अंशांच्यावर सोलापूर शहर आणि ग्रामीण भागाचं तापमान गेलेलं आहे. हा पारा वाढतच असल्याने उष्णतेच्या झळा सोलापूरमध्ये जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहा उन्हात फिरू नका, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी असे डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.
advertisement
सोलापुरात गेल्यामागील दोन दिवसांपासून पारा वाढतच चालला आहे. उष्णतेच्या झळा सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून उन्हाचा चटका बसायला सुरू होत आहे. कामाशिवाय घराबाहेर पडायचं नागरिक टाळत आहेत. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. सध्या मार्च महिना सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेने गाठलेल्या उच्चांकाने नागरिक हैराण झालेले आहेत.
चायनीज पदार्थातील अजिनोमोटोचे सेवन करताय? वेळीच व्हा सावध, शरीरावर होतील 'हे' गंभीर परिणाम
सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाने सरकारी रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू केले आहे. उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती असते, स्वतःची काळजी घेणे महत्वाचे उपाय आहे. लहान मुलं, उन्हात काम करणारे कामगार, गरोदर महिला, मधुमेहाचे रुग्ण यांना उष्माघाताचा अधिक त्रास होतो. उष्माघातामुळे त्वचेवर रॅशेस उमटतात, हातापायाला गोळे येतात, चक्कर येते.
नागरिकांनी जास्त उन्हात फिरू नये. भरपूर पाणी प्यावे, सोबत पाणी ठेवावे. फिकट रंगाचे कपडे परिधान करावे. उन्हात असताना डोक्यावर टोपी किंवा ओलसर कपडा डोक्यावर ठेवावा. कष्टाची कामे उन्हात करू नये. उन्हात पार्क केलेल्या चार चाकी वाहनात बसू देऊ नका, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केली आहे.