उन्हाळ्यातील बहुतेक समस्या पोट आणि पचनाशी संबंधित असतात. त्यामुळे आपलं पचन निरोगी ठेवण्यासाठी पोटाचं आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात तुमच्या पोटासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर असलेल्या 5 सुपरफूड्सबद्दल जाणून घेऊया.
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी ही फळं खा
1. कलिंगड - कलिंगड भरपूर पाणीदार, हायड्रेटिंगसाठी उपयुक्त आहे. उन्हाळ्यात कलिंगडाला जास्त पसंती असते. यात 92 टक्के पाणी असतं, यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते. कलिंगडामुळे डिहायड्रेशन टाळता येतं आणि पचन सुधारतं.
advertisement
Summer Care : दही खा, तंदुरुस्त राहा, उन्हाळ्यासाठी आरोग्यकारक, आल्हाददायक पदार्थ
2. पपई - पपईला पाचक सुपरफूड म्हटलं जातं. पपईमध्ये असलेल्या पपेन एंझाइममुळे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यकृताला डिटॉक्सिफाय करण्यासाठी याची मदत होते.
3. काकडी - पोट थंड करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. काकडीमध्ये भरपूर फायबर आणि पाणी असतं, यामुळे शरीर डिटॉक्स करता येतं आणि आम्लता आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
Summer Care: उन्हाळ्यात शरीराला किती पाणी आवश्यक ? योग्य प्रमाणात पाणी प्या, तब्येतीची काळजी घ्या
4. लिंबू - लिंबू हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं सुपरफूड आहे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, पचन सुधारणं आणि शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी लिंबू उपयुक्त आहे.
5. दही - दही म्हणजे पोटासाठी अमृतासारखं आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि पचन मजबूत होतं. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास देखील याचा उपयोग होतो.
उन्हाळ्यात योग्य आहार घेतल्यानं शरीराला नैसर्गिकरीत्या थंडावा आणि ऊर्जा मिळते. कलिंगड, पपई, काकडी, लिंबू आणि दही हे पदार्थ खाल्ल्यानं पचनसंस्था मजबूत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर नैसर्गिकरित्या थंड होतं.