बुरहानपुर : वजन वाढवण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारचे उपाय करतात. मात्र, तरीही त्यांना फायदा होत नाही. म्हणून अनेक जण वजन कमी करण्यासाठी व्यायामही करतात. मात्र, यावरच एक ठिकाण असं आहे, ज्याठिकाणी फक्त 7 दिवसात वजन मी केले जाते. नेमकं हे ठिकाण कुठे आहे, याठिकाणी नेमक्या कशा पद्धतीने उपचार केले जातात, याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर या जिल्ह्यात निसर्गोपचाराने वजन फक्त 7 दिवसात कमी होते. जिल्ह्यातील खडकोद याठिकाणी अखिल विश्व गायत्री परिवारच्या वतीने निसर्गोपचार शिबिराचे आयोजन केले आहे. तिथे 7 दिवस कॅम्प केल्याने तुमचे वजन 4 ते 5 किलोने कमी होईल.
7 दिवसात वजन कमी -
निसर्गोपचार केंद्राचे प्रमुख मनोज तिवारी हे आहेत. त्यांना 20 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जर तुमचे वजन वाढत असेल तर घाबरण्याचे काहीही कारण नाही. तुम्हाला निसर्गोपचार पद्धतीच्या नियमांचे पालन करायचे आहे. असे केल्याने 7 दिवसात तुमचे 4-5 किलो वजन कमी होईल. याठिकाणी शंख प्रस पालन क्रिया केली जाते. यामुळे तुमचे वजन कमी व्हायाला सुरुवात होईल. तुम्हाला 7 दिवस असा आहार दिला जातो की, तुमचे वजन वाढत नाही. तसेच तुमच्या शरीराला कोणते नुकसानही होत नाही.
24 प्रकारच्या क्रिया -
या शिबिरात येणाऱ्या लोकांना 24 प्रकारच्या क्रिया करायला सांगितल्या जातात यामुळे वजन कमी व्हायला सुरुवात होते. तुम्ही आरोग्यदायी होऊ लागतात. या ठिकाणी शिबिरात आल्याने मोठ्यातले मोठे आजारही संपतात. जर तुम्ही या शिबिरात 7 दिवस येतात आणि तुम्हाच्यावर येणारा फक्त खर्च घेतला जातो.
health tips : उन्हाळ्यात होतोय घामोळ्यांचा त्रास, तर आताच करा हा उपाय, लगेच मिळेल आराम..
संस्थेचा मुख्य उद्देश्य हा लोकांना आरोग्यदायी जीवन प्रदान करणे आहे. पैसे कमावणे नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 ते 7 तारीख आणि 21 ते 28 तारखेपर्यंत केंद्रात शिबिराचे आयोजन केले जाते. तुम्हालाही शिबिरात सहभागी व्हायचे असेल तर केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागेल.
सूचना : वर दिलेली माहिती ही तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. कोणतेही औषधी वगैरे वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.