कोल्हापूर : आपल्या मुलासाठी आई कोणताही त्याग करायला तयार असते. एक वेळ आपला जीव धोक्यात घालून आपल्या मुलाचा जीव वाचवण्याचा तिचा प्रयत्न असतो. असाच प्रत्यय कोल्हापूरच्या एका मायलेकाच्या उदाहरणावरून येत आहे. मुलाला आजारपणातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी कोल्हापूरच्या या आईचा जीव तीळ तीळ तुटत आहे. दोन्ही किडन्या निकामी झालेल्या मुलाला किडनी देऊन नवजीवन देण्याचा तिचा प्रयत्न आहे. पण रुग्णालयाच्या खर्चासाठी तिची वणवण सुरू आहे.
advertisement
दोन्ही किडनी निकामी
कोल्हापुरच्या पन्हाळा तालक्यातील दिगवडे गावची ही घटना आहे. शरद शिंदे हा तरुण आपल्या आई-वडिल यांच्याबरोबर राहत सुखी संसार करत होता. गावातील आपल्या छोट्या सलूनच्या कमाईवरच तो आपल्या बायको आणि मुलांसह घरची जबाबदारी उचलत होता. मात्र काळाच्या मनात काही वेगळेच होते. काही दिवसांपूर्वी त्याला मूत्रविकाराचा त्रास जाणवू लागला. पुढे त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले अन् आख्खे कुटुंबच कोलमडून गेले.
कॅन्सरची गाठ ओळखावी कशी? निदानास वेळ लागल्यास किती वाढतो धोका? Video
रुग्णालयाच्या खर्चाचा प्रश्न
शरदला वाचवण्यासाठी एका किडनी प्रत्यारोपणाची गरज होती. मग यावेळी त्याची आई मंगल शिंदे या पुढे सरसावल्या. लेकाला वाचवण्यासाठी मी माझी किडनी द्यायला तयार आहे, असे त्या मातेने ठामपणे सांगितले. तपासणीत आईची किडनी शरदसाठी मॅचही झाली. मात्र पुढे सर्वात समस्या होती ती म्हणजे शरदच्या सर्व उपचारासाठी होणारा खर्च. हातावरचे पोट असणारे शिंदे कुटुंब शरदच्या कमाईवरच गुजराण करत होते. मात्र आता तोच अंथरुणाला खिळल्यामुळे सर्वांपुढे काय करावे हाच प्रश्न उभा राहिला होता.
मदतीची हाक
या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शिंदे कुटुंबाने मदतीची आर्त हाक कोल्हापूरकरांना दिली आहे. शरद याच्यावर होणारी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि उपचार यासाठी होणारा खर्च हा लाखांच्या घरात आहे. शस्त्रक्रियेपूर्वी देखील शरदवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळेच समाजातल्या दानशूर व्यक्तींनी या मायलेकाची मदत करण्याची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत कित्येकांनी सामाजिक भान जपत आपल्या परीने मदत पुरवली आहे. आजवर सव्वा चार लाखांच्या वर रक्कम मदत स्वरुपात जमा झाली आहे. मात्र मिळत असणारी मदत अपुरी असून अजूनही मदतीची गरज शरद आणि मंगल शिंदे यांना आहे.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा, मटन स्वस्त झालंच पाहिजे म्हणत काढली सायकल रॅली, Video
मदतीसाठी बँकेची माहिती
शरदच्या शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी मदत म्हणून देऊ इच्छिणाऱ्यांना त्यांची रक्कम ही बँक ऑफ इंडियाच्या कोतोली ब्रँचच्या 094810110000240 या बँक अकाऊंट नंबरवर पाठवता येईल.
संपर्क - शरद शिंदे 9765911327 (गुगलपे)