हवामानाच्या बदलत्या मूड सोबतच आपण आपल्या काही सवयी देखील बंद केल्या पाहिजेत, बदलल्याही पाहिजेत. आरोग्यासाठी योग्य, ज्यामुळे आरोग्य उत्तम राहतं आणि वजन वाढत नाही असा आहार घेण्याचा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञ देतात. प्राचीन वैद्यकीय अभ्यासातही वजन कमी करण्यासाठी आहारावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.
जेवणामध्ये जास्त अंतर नसावं
advertisement
दोन आहारांमध्ये जास्त अंतर ठेवू नका. फक्त एक ते तीन तासात काहीतरी ठोस आणि निरोगी खाण्याची सवय लावली पाहिजे असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. अंडी, चीज किंवा दही यांसारख्या प्रथिन स्रोतांचा त्यात समावेश असावा.
Oral Health : दात किडलेत ? अशी घ्या काळजी, खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करा
तसंच तंतुमय कर्बोदकं असलेला आहार वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. दिवसाची संतुलित सुरुवात करण्यासाठी न्याहारीत फळं किंवा भाज्यांचा समावेश करा. लहान मुलाला ज्याप्रमाणे संतुलित आहार देण्याचा प्रयत्न होतो तसाच नियम मोठ्यांच्या आहारातही असावा.
तीन ते चार तासांनंतर भाज्यांचं सूप किंवा सॅलड घ्या. दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणातील अंतर यामुळे चांगल्या प्रकारे भरून काढता येतं. त्यामुळे नंतर जास्त भूक लागत नाही. पोषणतज्ञांच्या मते, फळ किंवा स्मूदी हाही चांगला पर्याय आहे. रात्रीचं जेवण लहान स्नॅक्स नंतर सुमारे चार तासांनी खाल्लं पाहिजे असं तज्ज्ञ सांगतात.
शिजवलेल्या भाज्या आणि ताज्या सॅलडचा यात समावेश करा. सोया मिल्क किंवा दहीसोबत हाय फायबर असलेली तृणधान्यं हा दुसरा पर्याय आहे. याशिवाय रात्रीच्या जेवणात दूध आणि केळी देखील घेऊ शकता.
जेवताना घाई करू नका
काही मुलं जेवताना घाई करतात तशी करु नका. आरामात खाण्यासाठी 10-15 मिनिटं लागतात. प्रौढांनीही तेच केलं पाहिजे असा सल्ला तज्ज्ञ देतात. प्रत्येक घास चावून खा असंही आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे. हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तज्ज्ञांच्या मते यामागे मानसशास्त्र आहे. खूप लवकर खाल्ल्यानं मेंदूला पोट भरलं आहे हे समजणं कठीण होतं.
भूक लागल्यावरच खा
तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काहीही खाणं टाळा. भूक लागली असेल तेव्हाच अन्न खा आणि कंटाळा आला आहे किंवा कोणता ताण आहे म्हणून खाऊ नका. लहान मुलांप्रमाणेच, भूक लागल्याचे संकेत ऐका असं तज्ज्ञ सांगतात.
कमी अंतरानं खाणं, घाई टाळणं आणि भुकेनुसार आणि मूडनुसार न खाणं ही वजन कमी करण्यासाठी तीन महत्त्वाची सूत्रं असू शकतात. कारण प्रत्येकाचा स्वभाव आणि प्रकृती वेगळी असते त्यामुळे कोणत्याही प्रकारची सवय आपल्या जीवनशैलीचा भाग बनवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.