पावसाळ्यात होणारे आजार
साचलेल्या पाण्यात उंदीर किंवा इतर प्राण्यांच्या लघवीतून आलेले बॅक्टेरिया त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. तेव्हा लेप्टोस्पायरोसिस या रोगाला सामोरे जावे लागते. साचलेल्या पाण्यात डास वाढतात आणि त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया हे आजार होतात. डेंग्यू एडिस डासांमुळे, तर मलेरिया अॅनॉफिलीस डासांमुळे होतो. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो सारखे पोटाचे आजार होतात. तसेच हिवताप, टायफॉईड यासारखा आजारांचा सामाना देखील करावा लागू शकतो.
advertisement
Milk Benefits: दूध आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, पण पॅकेटमधील दूध खरच उकळून प्यायला हवं का?
रोगांची लक्षणे आणि उपाय
ताप, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, पुरळ, डोळ्यांत लाली अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा, शक्य असल्यास गम बूट किंवा बंद पादत्राणे वापरा. पाणी उकळून किंवा फिल्टर करूनच प्या. घराभोवती पाणी साचू देऊ नका; डास रोखण्यासाठी फवारणी करा. पूर्ण बाह्यांचे कपडे आणि मच्छरदाणी वापरा. शरीराला जखम असल्यास साचलेल्या पाण्याचा संपर्क होऊ नये, याची काळजी घ्या.
साचलेलं पाणी ही फक्त अडचण नाही, तर गंभीर आरोग्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून स्वच्छता व सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. जर सांगितलेली लक्षणे दिसली तर दुर्लक्ष न करता तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.