जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे शरीरात पाणी साचतं, रक्ताचं प्रमाण वाढतं आणि रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि किडनीच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. अनेकदा नकळतपणे प्रक्रिया केलेल्या आणि फास्ट फूडमधून खूप जास्त मीठ खाल्लं जातं, त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जास्त मीठ खाण्याची खाल्लं जात असल्याचे संकेत ओळखणं महत्त्वाचं आहे.
advertisement
1. पुन्हा पुन्हा तहान लागणं
आहारात जास्त मीठ असेल तर सतत तहान लागते. मीठामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. यामुळे तहान लागण्याचं प्रमाण वाढतं. शरीराला अधिक द्रवपदार्थांची आवश्यकता भासते.कोणत्याही कारणाशिवाय जास्त पाणी प्यायलं तर ते जास्त प्रमाणात मिठाच्या सेवनामुळे असू शकतं हे लक्षात ठेवा.
Weight Loss : वजन कमी करायचं असेल तर मूल व्हा ! तीन सवयींमुळे कमी होईल वजन
2. सूज
जास्त मिठामुळे शरीरात पाणी साचतं, ज्यामुळे हात, पाय, घोट्यावर आणि चेहऱ्यावर सूज येते. यामुळे ब्लोटिंग होतं.
3. उच्च रक्तदाब
सोडियम म्हणजेच मीठामुळे रक्ताचं प्रमाण वाढून रक्तदाबावर परिणाम होतो.ज्यामुळे हृदयाला जास्त काम करावं लागतं. निरोगी जीवनशैली असूनही तुम्हाला सतत उच्च रक्तदाब होत असल्यास, जास्त मीठ खाणं हे एक कारण ठरू शकतं.
4. वारंवार डोकेदुखी
मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यानं डिहायड्रेशन आणि रक्तदाबात बदल झाल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. जेव्हा मीठ पेशींमधून पाणी काढते, तेव्हा ते मेंदूतील हायड्रेशन कमी करू शकतं, ज्यामुळे काही व्यक्तींमध्ये तणावामुळे डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
Oral Health : दात किडलेत ? अशी घ्या काळजी, खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करा
5. मूत्रपिंड समस्या
मूत्रपिंड शरीरातील अतिरिक्त सोडियम फिल्टर करतं, पण आहारात मीठ जास्त असतं तेव्हा त्यांना अधिक मेहनत करावी लागते. कालांतराने, या तणावामुळे मूत्रपिंडाचं नुकसान होऊ शकतं आणि काहीवेळा मुतखडा देखील होऊ शकतो.
6. पोट फुगणं आणि पचनाच्या समस्या
सोडियम जास्त असलेल्या आहारामुळे, विशेषत: पोटाच्या भागात सूज येऊ शकते. जास्त सोडियममुळे पचनमार्गात पाणी टिकून राहतं, काहींना जास्त मीठामुळे बद्धकोष्ठतादेखील होऊ शकते.