उन्हाळ्यात शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. वाढत्या तापमानामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे डिहायड्रेशन, अशक्तपणा आणि थकवा येतो. डिहायड्रेशनमुळे तुम्ही गंभीर आजारी पडू शकता. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणं खूप महत्वाचं आहे. पण प्रश्न असा आहे की उन्हाळ्यात किती लीटर पाणी प्यावं आणि कमी पाणी प्यायलं तर शरीरात कोणते बदल होतात समजून घेऊया.
advertisement
उन्हाळ्यात किती लिटर पाणी प्यावं -
उन्हाळ्यात शरीराला सामान्य दिवसांपेक्षा जास्त पाण्याची आवश्यकता असते. साधारणपणे निरोगी व्यक्तीनं 8-10 ग्लास ( सुमारे 2.5.- 3 लीटर ) पाणी प्यावं. हा आकडा शारीरिक हालचाली, वय आणि ऋतूनुसार बदलू शकतो.
खूप घाम येत असेल किंवा बाहेर काम करत असाल तर 3-4 लीटर पाणी आवश्यक आहे. दिनक्रमात जास्त हालचाली नसतील तर 2.5-3 लीटर पाणी पुरेसं आहे. व्यायाम करत असाल तर 4 लीटर पाणी पिणं चांगलं.
Summer Care : उन्हाळ्यात आहारात भेंडी नक्की खा, हे आहेत भेंडीचे आरोग्यदायी फायदे
कमी पाणी पिण्यामुळे शरीरात होणारे बदल -
डिहायड्रेशन आणि अशक्तपणा: शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा थकवा, डोकेदुखी आणि आळस जाणवू लागतो.
पचनाच्या समस्या: कमी पाणी प्यायलानं बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि अपचन होऊ शकतं.
त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते: शरीरात आर्द्रता कमी असेल तर त्वचेची चमक कमी होते आणि कोरडेपणा वाढतो.
उष्णतेशी संबंधित आजार वाढतात: उष्माघात, चक्कर येणं आणि कमी रक्तदाब या समस्या जाणवू शकतात.
Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेसाठी पारंपरिक उपाय, त्वचेला मिळेल थंडावा
लघवीचा रंग बदलतो : कमी पाणी प्यायल्यानं लघवीचा रंग पिवळा दिसतो.
शरीर हायड्रेटेड कसं ठेवावं ?
तहान लागली नसली तरीही दर दोन तासांनी पाणी प्या. नारळ पाणी, लिंबूपाणी आणि टरबूज, काकडी, संत्री अशी फळं खा. चहा आणि कॉफीऐवजी हर्बल पेय आणि ताजे रस पिण्यावर भर द्या.
उन्हाळ्यात योग्य प्रमाणात पाणी पिणं आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे.
दररोज 2.5-3 लीटर पाणी प्यायलं तर डिहायड्रेशन आणि उष्णतेशी संबंधित समस्या टाळू शकता. यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं, त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी प्यायला विसरू नका. उन्हाळ्यात तब्येतीकडे जास्त लक्ष द्या.