त्वचेचं रक्षण आणि त्वचेचा घट्टपणा कायम ठेवण्यासाठी प्रसिद्ध त्वचा तज्ज्ञ शहनाज हुसेन यांनी दिलेल्या सल्ल्याचा उपयोग उन्हाळ्यातही होऊ शकतो. निस्तेज आणि सैल झालेल्या त्वचेसाठी व्हिटॅमिन ई उपयोगी आहे. व्हिटॅमिन ईमुळे त्वचेला घट्ट करणाऱ्या पेशींचं पुनरुज्जीवन होण्यास मदत मिळते.
Summer Diet : संतुलित आहारावर भर द्या, उन्हाळ्यात फिट राहा
त्वचेसाठी व्हिटॅमिन ई चे फायदे -
advertisement
-व्हिटॅमिन ईमुळे पेशींचं पुनरुत्पादन होण्यास चालना मिळते.
-व्हिटॅमिन ई अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतं, ताण कमी करून योग्य रक्ताभिसरण होण्यासाठी याची मदत होते.
-सूर्यामुळे होणारं नुकसान रोखण्यासाठी व्हिटॅमिन ईचा उपयोग होतो. त्वचा चमकदार दिसते आणि त्वचेवरचे डाग कमी होतात.
-त्वचेला आर्द्रता मिळते.
-व्हिटॅमिन ई मध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्यामुळे त्वचा निरोगी होते.
Summer Health Drink : नारळ पाण्यानं घालवा अशक्तपणा, उन्हाळ्यात तब्येत राहिल चांगली
व्हिटॅमिन ई चा वापर
व्हिटॅमिन ई असलेलं स्किनकेअर ऑइल किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल थेट त्वचेवर लावता येते, यामुळे त्वचेला पोषण मिळतं.
व्हिटॅमिन ई असलेलं मॉइश्चरायझर वापरल्यानं त्वचेला ओलावा मिळतो, ज्यामुळे छिद्रं घट्ट होतात.
व्हिटॅमिन ई स्किन सीरम वापर त्वचेवर थेट लावता येतं.
व्हिटॅमिन ई असलेल्या सनस्क्रीनमुळे सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचं संरक्षण होतं.
त्यामुळे, त्वचेच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ई असलेली हर्बल उत्पादनं निवडण्याचा सल्ला शहनाज यांनी दिला आहे. हर्बल उत्पादनांमुळे त्वचेचं रक्षण होतं आणि याचे दुष्परिणाम कमी जाणवतात.