सध्या जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि त्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. संपूर्ण जगाच्या बातम्या इथे उपलब्ध असतात. बरेच लोक विविध विषयांवरचे रील पाहण्यात दिवस घालवतात. तुम्ही सुद्धा अहोरात्र रील पहात राहता आणि तुम्हाला वेळेचं भान नसेल तर ही बाब चिंताजनक ठरु शकते. रिल्स पाहण्याचं व्यसन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये दिसून येतं. यामुळे वेळेचा अपव्यय तर होतोच शिवाय कामावरून लक्ष विचलित होतं. त्यामुळे तुमच्या या सवयीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
advertisement
Skin Care : चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा, ग्लो राहिल कायम
वेळ मर्यादित ठेवा
या सवयीपासून मुक्ती मिळवायची असेल तर मोबाईलवर किती वेळ घालवायचा याची मर्यादा निश्चित करा. तुम्ही तुमची मर्यादा ठरवली की मग तुम्ही या व्यसनातून बाहेर पडू शकता. सुरुवातीला ही सवय घालवणं कठीण वाटू शकतं पण हळूहळू याची सवय होईल.
काम करताना रील पाहू नका
अनेकदा काम करत असताना मोबाईलवर रिल्स वाजत राहतात. अशावेळी सोशल मीडियातून लॉग आउट होणं हा चांगला पर्याय आहे. यामुळे तुमचं कामही लवकर होईल आणि ही सवय कमी होण्यासही मदत होईल.
Salt : जास्त मीठ खाणं तब्येतीसाठी धोकादायक, ही लक्षणं लक्षात ठेवा, प्रकृतीची काळजी घ्या
इतर गोष्टींकडे लक्ष द्या
रील पाहण्यात तासन्तास घालवण्याऐवजी इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. फलदायी काम करा, इतर कामांवर लक्ष केंद्रित करा, आणि हळूहळू सोशल मीडियाची सवय कमी करा.
मोबाईल दूर ठेवा
एक दिवस ठरवा आणि त्या दिवशी मोबाईलपासून पूर्णपणे दूर राहा. मित्र - मैत्रिणी किंवा कुटुंबासह एखाद्या ठिकाणी भेट देण्याचा प्लान करा. काही दिवस केवळ महत्त्वाच्या कामांपुरताच मोबाईल जवळ ठेवा. इंटरनेट आणि स्मार्ट फोन नव्हता तेव्हाही काम होत होती याची आठवण स्वत:ला करुन द्या.
छंद जोपासा
कामाव्यतिरिक्त उरलेला वेळ स्वत:ला देण्याचा प्रयत्न करा. छंद जोपासा. सोशल मीडिया हे रेडिमेड खाद्य आहे. यामुळे मेंदू काम कमी करेल. मेंदूला आव्हान वाटेल, मेंदूचा कस लागेल अशा कामात वेळ घालवा. सतत कार्यमग्न असाल तर स्वत:ला वेळ द्यायला शिका आणि हळूहळू सोशल मीडियाचा वापर कमी करा.