अमरावती : अनेक वेळा चुकीच्या खानपानामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतात. काही पदार्थ खाण्याची योग्य वेळ असते. ते पदार्थ त्याच वेळेत सेवन केल्यास फायदा मिळतो. अनेक असे अन्न पदार्थ आहेत ज्यांचे सेवन रात्री केल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. ते पदार्थ कोणते? आणि रात्रीच्या वेळी आहारात कशाचा समावेश असावा? याबाबत डॉ. चैतन्य वाघमारे यांनी माहिती दिलीय.
advertisement
रात्रीच्या वेळी आहारात कशाचा समावेश असावा आणि कशाचा नाही?
कोणतेही अन्न पदार्थ सेवन करण्याचा एक वेळ ठरलेला असतो. जसं फळ हे सकाळच्या वेळी खाणे जास्त फायदेशीर असतात. त्याचबरोबर असे अनेक पदार्थ आहेत, ते त्या त्या वेळेत सेवन केल्यास त्याचा फायदा होतो. अन्यथा शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात.
Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खाज सुटतेय? डॉक्टरांनी सांगितले उपाय
काही अन्न पदार्थ असे आहे ज्याचे सेवन रात्रीच्या वेळी केल्यास त्रास होतो. त्यातील सर्वात पहिला पदार्थ म्हणजे दही. दह्याचे सेवन रात्रीच्या वेळी केल्यास त्यातील गुड बॅक्टेरिया आपल्या शरीरावर विपरीत परिणाम करतात. त्यामुळे घशाचे वेगवेगळे आजार जोर करतात. त्यानंतर मसाल्याचे पदार्थ सुद्धा रात्रीचे खाणे टाळावे. त्यामुळे ॲसिडिटीचा प्रचंड त्रास होतो. त्याचबरोबर मैद्याचे पदार्थ सुद्धा अती प्रमाणत खाऊ नये, रात्रीचे तर खाऊच नये. त्यामुळे ब्लडप्रेशर, शुगर, हायपरलिपिटीमिया असे वेगवेगळे आजार आपल्याला होण्याची शक्यता असते, असं डॉ. चैतन्य वाघमारे सांगतात.
रात्रीच्या वेळी फळ सुद्धा खाऊ नयेत. फळ खाण्यासाठी सर्वात उत्तम वेळ ही सकाळची असते. सकाळच्या वेळी फळाचे सेवन केल्याने त्यातून मिळणारे सर्व घटक आपल्या शरीरात व्यवस्थित पोहचतात. त्यामुळे फळ रात्रीची खाणे टाळावे आणि सकाळी आवर्जून फळांचे सेवन करावे.
टॉन्सिल्स सुजल्यामुळे घसा दुखतोय, बोलायलाही जमत नाही? करा उपाय, घरीच मिळवा आराम!
सर्वात महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळी गोड खाणे टाळले पाहिजे. रात्रीच्या वेळी गोड पदार्थाचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो. शुगरचा सुद्धा त्रास होऊ शकतो. लठ्ठपणा वाढला की ब्लडप्रेशर ही समस्या निर्माण होते. रात्रीच्या आहारात हलके अन्न पदार्थ घ्यायला पाहिजेत. जेवण केल्यानंतर शतपावली करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. या सर्व बाबी जे तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्यात तर तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत, असे डॉ. चैतन्य वाघमारे यांनी सांगितले.
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.





