कोलेस्टेरॉल आणि पेरिफेरल आर्टरी डिसीज
कोलेस्टेरॉल हा एक चिकट पदार्थ आहे, जो शिरांमध्ये चिकटून राहतो. त्यामुळे शिरा ब्लॉक होऊन हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो आणि रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. पण जेव्हा शिरा ब्लॉक होऊ लागतात तेव्हा त्याची काही लक्षणं पायांमध्ये दिसू लागतात. या समस्येला पेरिफेरल आर्टरी डिसीज म्हणतात.
advertisement
थंड पाय
सीडीसीच्या मते, पेरिफेरल आर्टरी डिसीजमुळे पाय थंड होऊ शकतात. कारण नेहमी ब्लड सर्कुलेशनमुळे ते उबदार राहतात. रक्त पुरवठा न झाल्याने ते थंड होतात.
पायांना सूज येणं
पायांना सूज येण्याचं मुख्य कारण पेरिफेरल आर्टरी डिसीज असू शकतं. शिरा बंद झाल्यामुळे शरीराच्या खालच्या भागाला पुरेसं रक्त मिळत नाही आणि त्यामुळे सूज येते.
पायात वेदना होणं
हे लक्षण या रोगाचं सर्वांत सामान्य लक्षण आहे. कोणतीही शारीरिक क्रिया करताना किंवा विश्रांती घेत असतानाही रुग्णाला ही वेदना जाणवू शकते. या सोबतच पायात सुई टोचल्याची भावनादेखील असू शकते.
पायावर जखमा
पायापर्यंत रक्त पोहोचत नसल्यामुळे जखमा किंवा घाव होऊ शकतात. अशा जखमा अनेकदा पाय, घोटे, तळवे आणि पायांची बोटं या ठिकाणी होतात. कारण रक्ताच्या कमतरतेमुळे पेशी, उती आणि शिरांना नुकसान पोहोचतं.
व्यायाम करताना वेदना होणं
पेरिफेरल आर्टरी डिसीजमुळे वेदना होतात. पायात गोळे येतात, सुन्नपणा जाणवतो आणि थकवा येतो, जो व्यायामादरम्यान वाढतो. व्यायाम करताना स्नायूंना अधिक रक्तपुरवठा आवश्यक असतो. पण पेरिफेरल आर्टरी डिसीज असल्यास तो रक्त पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही.
पायाची नखं जाड होणं
हाय कोलेस्टेरॉलमुळे होणाऱ्या पेरिफेरल आर्टरी डिसीजमध्ये पायाच्या नखांमध्ये बदल होऊ शकतो. त्यांची वाढ मंदावते आणि ते जाड होऊ शकतात. हे पेरिफेरल आर्टरी डिसीज असल्याचे संकेत देतात. पण तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.