हिरव्या पालेभाज्या : चॅटजीपीटीनुसार, पूर्वीचे राजे आणि सम्राट पालक आणि हिरव्या पालेभाज्या भरपूर खात असत. यामध्ये पालक, मेथी, राजगिरा या भाज्यांचा समावेश होता. लोहाचं प्रमाण जास्त असल्याने पालकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे.
कंदमुळे : रताळी हा कार्बोहायड्रेट्सचा एक उत्तम स्रोत आहे. अरबी भाजीमध्ये स्टार्च असल्यामुळे तीदेखील मोठ्या प्रमाणात खाल्ली जात होती. मुळा आणि त्याची पानं खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.
advertisement
भोपळावर्गीय भाज्या : दुधी भोपळा, कारलं, पेठा यांचादेखील पूर्वीच्या काळात जेवणात समावेश केला जात होता. आयुर्वेदानुसार, कारल्यात विशेष औषधी गुणधर्म असतात. भोपळ्याचा वापर सूप आणि मिठाईसारख्या विविध पदार्थांमध्ये वापर केला जात असे. पेठ्याचा वापर भाजी आणि मिठाई बनवण्यासाठी केला जात असे.
शेंगा : विविध प्रकारच्या हिरव्या शेंगांचादेखील भाजी म्हणून वापर होत असे. त्यामध्ये प्रोटीन्स असतात. बीन्स, गवार, सोयाबीन, शेवगा आणि चवळीच्या शेंगा भरपूर प्रमाणात खाल्ल्या जात होत्या. यामध्ये प्रोटीन, लोह आणि जीवनसत्त्वं चांगल्या प्रमाणात असतात.
प्राचीन काळी विविध प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जात होत्या. यामध्ये वांगी, शेवगा, कांदा, काकडी आणि लसूण या भाज्यांचाही समावेश आहे. वांग्याचा वापर अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जात असे. अन्नाची चव वाढवण्यासाठी कांदे आणि लसूण यांचा वापर केला जात असे. उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी काकडी खाल्ली जात असे.