गॅस सिलेंडरमध्ये किती गॅस उरलाय हे ओळखण्याचे सोपे उपाय
१. गरम पाण्याचा वापर
एक पातेलं घेऊन थोडं पाणी गरम करा (उकळू नका). हे पाणी सिलेंडरच्या बाहेरुन वरच्या दिशेनं खाली हलकेच ओता. काही सेकंदांनी हाताने सिलेंडरला स्पर्श करा. ज्या भागात गॅस असेल तिथपर्यंतचा भाग तुम्हाला थंड लागेल आणि जिथे गॅस नसेल तिथली जागा गरम वाटेल. यावरून गॅसची पातळी कुठवर आहे हे अंदाजता येतं.
advertisement
२. आगीचा रंग लक्षात घ्या
जर बर्नर सुरू करताना निळ्या रंगाऐवजी ऑरेंज रंगाची आग दिसत असेल, तर गॅस संपत आल्याचा हा इशारा आहे. गॅसचं दाब कमी झाल्यावर आगीचा रंग बदलतो.
गॅस संपण्याच्या अडचणी टाळण्यासाठी हे उपाय वेळोवेळी करून बघितले, तर स्वयंपाक अर्धवट राहणार नाही आणि सिलेंडर अचानक संपल्याचा त्रास टाळता येईल. थोडं निरीक्षण आणि वेळेवर लक्ष दिलं, तर तुमचं स्वयंपाकघर नेहमी सुरळीत चालू राहील.