रांची : आधीच्या काळात घरातील वरिष्ठ मंडळी हे मुला-मुलींचे लग्न जुळवत होते. मात्र, आता अनेक ठिकाणी ही परंपरा बदलल्याचे दिसू येत आहे. आता अनेक तरुण-तरुणी हे स्वत: ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून जीवनसाथी निवडतात. मात्र, अनेकदा चुकीची माहिती दिली गेल्याने अनेकांची फसवणूक झाल्याचेही समोर आले आहे.
त्यामुळे लग्न ठरवताना काही गोष्टींची काळजी घेणे विशेष महत्त्वाचे आहे. तसेच लग्न हा आयुष्यभराचा प्रश्न असतो. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ नये, यासाठी त्याचे पालनही करायला हवे. जागरूक राहिले तर दोन कुटुंबांचे आयुष्य वाचू शकते. त्यामुळे यावेळी कोणती काळजी घ्यावी, याबाबत झारखंड येथील रांचीचे ब्यूरो एक्सपर्ट अभिषेक यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
नवरा कामानिमित्त राहायचा घराबाहेर, बायको कायम घरी बॉयफ्रेंडला बोलवायची, शेवटी सत्य समोर आलं अन्…
या गोष्टींची घ्या काळजी -
• अभिषेक सांगतात की, सर्वात आधी जेव्हा तुम्ही कधीही चॅट करत असाल तर कोणतीही महत्त्वाची आणि खासगी माहिती सांगू नका. तसेच अत्यंत पर्सनल लेव्हलवर जायची गरज नाही. आधी बोलून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
• कधीही घाई करू नका, आधी काही दिवस संवाद साधा. कारण खोटारडा व्यक्तीला घाई असते. त्याप्रत्येक वस्तू लवकर हवी असते. यासाठी कमीत कमी तीन चार महिने त्याच्यासोबत संवाद साधा, त्यानंतरच त्याच्याशी भेटायची इच्छा व्यक्त करा.
• याशिवाय त्याची प्रोफाईल अगदी चांगल्या पद्धतीने चेक करा. कुठे काम करतो/करते, काय काम करतो/करते. तसेच आपल्या नातेवाईकांकडूनही किंवा त्या कंपनीतही चौकशी करा की खरंच तो त्या कंपनीत काम करतो आहे किंवा नाही.
• तसेच भावनेच्या भरात वाहून कधीही आपले फोटो त्यांना पाठवू नका. कारण जो कुणी गंभीर व्यक्ती असेल तो कधीच तुम्हाला याप्रकारची मागणी करणार नाही. सोबतच कमीत-कमी 4-5 मिटिंग केल्यानंतरच कोणताही निर्णय घ्या.
एकदा नव्हे तर लग्नानंतर अनेकदा पळून गेली बायको, नवऱ्याला काय करावं ते कळेना, नेमकं काय घडलं?
• तसेच त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचे कुटंब आणि त्यांच्या गावाची पूर्ण माहिती काढा. तसेच एकदा ही सर्व माहिती क्रॉस चेक करुन घ्यावी. कदाचित यामध्ये वेळ जाईल, पण ही थोडी जागरुकता तुमचे आणि तुमच्या कुटुबीयांचे आयुष्य वाचवू शकते.