पोटऱ्या म्हणजे शरीराचं सेकंड हार्ट म्हटलं जातं कारण, शरीराच्या खालच्या भागातून रक्त वर पंप करण्याचं महत्त्वाचं काम पोटऱ्या करतात. यामुळे हृदयावरील दाब कमी होतो. चालण्यापूर्वी पोटऱ्यांसाठीचे व्यायाम केल्यानं स्नायू मजबूत होतात तसंच हृदय निरोगी राहण्यास देखील मदत होते.
Hair Care : केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय - भृंगराज, या टिप्सचा होईल उपयोग
advertisement
पोटरीचे स्नायू पंपासारखं काम करतात, पायांपासून हृदयापर्यंत रक्ताभिसरण यामुळे चांगलं होतं. हे स्नायू आकुंचन पावतात आणि विस्तारतात तेव्हा नसांमधे रक्त साचणं कमी होतं. यामुळे सूज, रक्ताच्या गुठळ्या आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.
पोटरीच्या मजबूत स्नायूंमुळे हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सुरळीत पुरवठा राखतात, ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो.
पोटऱ्या वर उचलण्याचा व्यायाम - पायांच्या बोटांवर उभं राहण्यासाठी हळूहळू टाचा उचला आणि नंतर पाठ खाली करा. हे बारा-पंधरा वेळा करा. या व्यायामामुळे पोटऱ्यांची ताकद आणि रक्त पंप करण्याची क्षमता सुधारते. या व्यायामाला calf raise म्हणतात. या व्यायामामुळे पोटऱ्यांमधे उष्णता निर्माण होते आणि हृदयाचा रक्त प्रवाह सुधारतो.
घोटे वर्तुळाकार फिरवणं - जमिनीपासून एक पाय उचला आणि टाच स्थिर ठेवून, घोट्याला घड्याळाच्या दिशेनं आणि नंतर घड्याळाच्या उलट दिशेनं प्रत्येकी दहा वेळा फिरवा. या व्यायामामुळे पोटरी भोवतालच्या स्नायू आणि सांध्यामधली लवचिकता सुधारते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं.
पायाच्या बोटांवर चालणं - पायाच्या बोटांवर उभं राहा आणि वीस-तीस पावलं हळूहळू चालत जा, नंतर सामान्य चालत या. या व्यायामामुळे पोटरीच्या स्नायूंची सहनशक्ती वाढते, ज्यामुळे चालतानाचा थकवा कमी होतो.
Women Health: खास महिलांसाठी हेल्थ टिप्स, आहारातल्या बदलांमुळे होईल मदत
बसून टाच उंचावणं - खुर्चीवर बसा आणि हळूहळू टाचा वर करा आणि खाली करा. हा व्यायाम पंधरा-वीस वेळा करा. बसून काम करणाऱ्यांसाठी हा चांगला व्यायाम आहे.
काल्फ स्ट्रेचिंग - भिंतीकडे तोंड करून उभं राहा आणि एक पाय पुढे आणि दुसरा मागे ठेवा. मागच्या पायाची टाच जमिनीवर ठेवा आणि पुढे वाका. वीस-तीस सेकंदांसाठी स्ट्रेच करा. या व्यायामामुळे पोटरीच्या स्नायूंमधील ताण कमी होतो, लवचिकता वाढते आणि चालताना वेदना जाणवत नाहीत.
