तांदळाच्या पाण्याबरोबरच डाळीचं पाणीही त्वचेसाठी उपयुक्त आहे. डाळीच्या पाण्यामुळे वजन कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी डाळीचं पाणी पिणं चांगलं.
तांदळाचं पाणी - तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घेऊया. तांदूळ शिजवण्यापूर्वी धुतले जातात आणि हे पाणी टाकून देतात, पण हे पाणी तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तांदळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी, सी आणि ई असतं, त्वचा निरोगी आणि मऊ ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं. तांदळाच्या पाण्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील निस्तेजपणा दूर करण्यास मदत करतात.
advertisement
Sleep : निद्रानाश कशामुळे होतो ? झोप न लागण्याची कारणं कोणती ?
डाळीच्या पाण्याचे फायदे - तांदळाच्या पाण्याप्रमाणेच, डाळीच्या पाण्याचाही त्वचेला फायदा होऊ शकतो. डाळ शिजल्यानंतर जे पाणी उरतं, त्यातली प्रथिनं आणि खनिजं त्वचेसाठी फायदेशीर असतात. हे घटक त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करतात. म्हणूनच डाळीचं पाणी पिण्याची शिफारस केली जाते. चेहऱ्यावरची चमक वाढवण्यासाठी मसूर किंवा मूग डाळीपासून बनवलेले फेस पॅक देखील बनवतात आणि लावतात.
Arthritis : संधिवात कसा होतो ? संधिवात होऊ नये यासाठी काय करायचं ? जाणून घ्या या हेल्थ टिप्स
त्वचा निरोगी राखण्यासाठी, नैसर्गिक घटकांचा वापर करणं उपयुक्त आहे. डाळीचं किंवा तांदळाचं पाणी देखील पूर्णपणे नैसर्गिक आहे, म्हणून तुम्ही ते वापरू शकता. याव्यतिरिक्त, दररोज रात्री चेहरा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर मॉइश्चरायझर लावणं आवश्यक आहे. यामुळे तुमच्या त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा ताजीतवानी राहते.