Arthritis : संधिवात कसा होतो ? संधिवात होऊ नये यासाठी काय करायचं ? जाणून घ्या या हेल्थ टिप्स
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
संधिवाताच्या वेदनांमुळे हालचाली मर्यादित होतातच तसंच साधी दैनंदिन कामंही कठीण होतात. सतत वेदना आणि सूज व्यक्तीला थकवून टाकते. पण निरोगी जीवनशैलीनं हा आजार टाळता येतो. चांगला आहार आणि दररोज योगासनं केल्यानं संधिवात होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
मुंबई : दरवर्षी बारा ऑक्टोबर हा जागतिक संधिवात दिन म्हणून साजरा केला जातो. या काळात, संधिवात आणि स्नायूंच्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध आरोग्य जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जातात.
संधिवात हा सांध्यांचा एक दाहक विकार आहे. सांध्याभोवतीच्या ऊतींवर यामुळे परिणाम होतो, ज्यामुळे सांधेदुखी आणि कडकपणा येतो. संधिवाताचे शंभरपेक्षा जास्त प्रकार आहेत.
PM2.5, हे धोकादायक सूक्ष्म कण फुफ्फुसांमधे खोलवर जातात. त्यांच्या संपर्कात आल्यानं हृदय आणि फुफ्फुसांचे आजारच होतातच तसंच संधिवातासारखे विकार देखील होऊ शकतात. याचा अर्थ प्रदूषण देखील संधिवात होण्यास कारणीभूत ठरत आहे. चीन आणि आता भारतातील अलिकडच्या अभ्यासातून हे दिसून आलं आहे.
advertisement
संधिवाताच्या वेदनांमुळे हालचाली मर्यादित होतातच तसंच साधी दैनंदिन कामंही कठीण होतात. सतत वेदना आणि सूज व्यक्तीला थकवून टाकते. पण निरोगी जीवनशैलीनं हा आजार टाळता येतो. चांगला आहार आणि दररोज योगासनं केल्यानं संधिवात होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
संधिवाताच्या वेदनांसाठी घरगुती उपाय - घामराच्या तेलानं मालिश केल्यानं किंवा पानांची पेस्ट लावल्यानं संधिवाताच्या वेदना आणि सूज कमी होते. गुग्गुळ हे औषध सांधेदुखी आणि संधिवात यासह विविध आजारांवर प्रभावी आहे. यामुळे सांधेदुखी, सूज आणि स्नायूंचा कडकपणा कमी होतो. अळशी, अक्रोड आणि मासे यांसारखे ओमेगा-3 असलेले पदार्थ सूज आणि वेदना कमी करतात.
advertisement
हळदीच्या दुधानं नैसर्गिकरित्या वेदना आणि सूज कमी होते, कारण हळदीतील करक्यूमिनमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी चावल्याने सांधेदुखी आणि जडपणा कमी होतो. लसणाचे औषधी गुणधर्म गुडघ्याची सूज कमी करतात, विशेषतः तुपात तळून खाल्ल्यानं याचा प्रभाव जास्त जाणवतो. तीळ किंवा मोहरीच्या कोमट तेलानं मालिश केल्यानं रक्ताभिसरण सुधारतं आणि वेदना कमी होतात.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 6:23 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Arthritis : संधिवात कसा होतो ? संधिवात होऊ नये यासाठी काय करायचं ? जाणून घ्या या हेल्थ टिप्स