Hyperpigmentation : चेहऱ्यावरचे काळे डाग कमी कसे करायचे ? हे तीन उपाय वापरुन बघा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
सूर्यप्रकाश, हार्मोनल बदल, प्रदूषण किंवा त्वचेची काळजी चुकीच्या पद्धतीनं घेणं या सर्व कारणांमुळे चेहऱ्यावर लहान तपकिरी किंवा काळे डाग दिसतात. या डागांमुळे त्वचेचा रंग निस्तेज होतो आणि त्वचा निस्तेज होते. ही समस्या विशेषतः महिलांमधे जास्त आढळते. मेकअप किंवा क्रीम वापरुन ते झाकण्याचा प्रयत्न केला जातो. काही जण विविध महागडे उपचार वापरतात. यासाठी काही नैसर्गिक घरगुची उपचार उपयुक्त ठरतात.
मुंबई : काहींच्या चेहऱ्यावर डाग असतात. काहींच्या चेहऱ्यावर कमी, काहींच्या चेहऱ्यावर जास्त दिसतात. आजकाल चेहऱ्यावरील डाग होण्याचं प्रमाण वाढलंय. सूर्यप्रकाश, हार्मोनल बदल, प्रदूषण किंवा त्वचेची काळजी चुकीच्या पद्धतीनं घेणं अशी अनेक कारणं यामागे आहेत.
या सर्व कारणांमुळे चेहऱ्यावर लहान तपकिरी किंवा काळे डाग दिसतात. या डागांमुळे त्वचेचा रंग निस्तेज होतो आणि त्वचा निस्तेज होते. ही समस्या विशेषतः महिलांमधे जास्त आढळते. मेकअप किंवा क्रीम वापरुन ते झाकण्याचा प्रयत्न केला जातो. काही जण विविध महागडे उपचार वापरतात.
advertisement
एकदा हायपरपिगमेंटेशन झालं की पूर्णपणे काढून टाकता येत नाही. पण, काही पद्धती वापरुन या डागांचं प्रमाण कमी करता येतं.
त्वचा तज्ज्ञांनी काही नैसर्गिक घरगुती उपचारांबद्दल माहिती दिली आहे. डाग हलके करण्यासाठी हे उपाय महत्त्वाचे आहेत. यात कोणतीही हानिकारक रसायनं नसतात आणि यामुळे त्वता आतून निरोगी होण्यास मदत होते.
advertisement
हळद + दूध- हळदीत कर्क्यूमिन असतं, ज्यामुळे काळे डाग कमी होतात आणि नैसर्गिक चमक येते हे सिद्ध झालं आहे. दरम्यान, दुधातील लॅक्टिक एसिड त्वचेला एक्सफोलिएट करतं आणि तिचा रंग एकसारखा करतं.
एक चमचा हळद पावडर आणि दोन चमचे कच्चे दूध मिसळून पेस्ट बनवा. पेस्ट चेहऱ्यावर लावा, पंधरा मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्यानं धुवा. आठवड्यातून दोन-तीन वेळा असं केल्याने डाग कमी होण्यास मदत होईल.
advertisement
बटाट्याचा रस - बटाट्यांमधील कॅटेकोलेज एंझाइम नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतं, यामुळे काळे डाग कमी करण्यास मदत होते. यासाठी एक बटाटा किसून त्याचा रस काढा. हा रस कापसानं चेहऱ्यावर लावा. दहा-पंधरा मिनिटांनी स्वच्छ पाण्यानं धुवा. दररोज असं केल्यानं काही आठवड्यांतच फरक दिसून येईल.
advertisement
पपईतील पपेन एंझाइममुळे हायपरपिगमेंटेशन कमी होतं. त्वचा तज्ज्ञांच्या मते, या फळात अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे रंग सुधारतो. पपई कुस्करुन पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा. दहा-पंधरा मिनिटांनी पाण्यानं धुवा.
त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, हे तीन घरगुती उपाय वापरुन डाग हळूहळू कमी होतात आणि त्वचेची नैसर्गिक चमक परत आणू शकतात. पण हे करताना, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं देखील महत्त्वाचं आहे. सूर्यप्रकाशात असताना नेहमी सनस्क्रीन लावा, त्वचा हायड्रेटेड ठेवा, तणाव टाळा आणि आहारात निरोगी पदार्थांचा समावेश करा. नियमित काळजी घेतली तर, त्वचा स्वच्छ, चमकदार दिसेल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 5:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hyperpigmentation : चेहऱ्यावरचे काळे डाग कमी कसे करायचे ? हे तीन उपाय वापरुन बघा