कठीण परिस्थितीतही मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता किती महत्त्वाची आहे. याची आठवण आपल्याला व्हावी यासाठी ही थीम ठेवण्यात आली आहे. पण आपण केवळ कठीण काळातच नव्हे तर दैनंदिन जीवनातही आपल्या मनाची काळजी घेतली पाहिजे.
सध्या वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियात आत्महत्या, द्वेषातून, वैमनस्यातून झालेलं क्रौर्य अशा अनेक बातम्या पाहतो, काही वेळा तर आपल्या आजूबाजूला या घटना घडत असतात. तणाव आणि डिप्रेशनच्या काळात मानसिक आरोग्याचा स्वीकार व्हावा त्याबद्दल जनजागृती व्हावी हा या दिवसाचा उद्देश आहे. शरीराची काळजी घेण्यासाठी व्यायाम, जिम असे अनेक पर्याय आहेत पण मनाच्या मशागतीकडे तितकं गांभीर्यानं लक्ष दिलं जात नाही. मनाचीही काळजी घ्या असा संदेश यातून दिला जातो.
advertisement
निसर्गाशी मैत्री - सतत फोन किंवा लॅपटॉपवर असाल तर थोडा ब्रेक घ्या. बाहेर फिरायला जा. झाडं आणि पक्ष्यांचं निरीक्षण करा. निसर्गात वेळ घालवल्यानं मनाला शांती मिळते आणि ताण कमी होतो. आवडत्या ठिकाणी जा. दीर्घ श्वसन करा.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात तुमच्यासोबत घडलेल्या तीन चांगल्या गोष्टी एका वहीत लिहा. तुम्हाला आवडलेली गोष्ट, जेवण, मदत अशा चांगल्या गोष्टी लिहून ठेवा. ही सवय तुम्हाला नकारात्मक विचारांपासून सकारात्मक विचारांकडे वळवेल आणि तुम्हाला आनंदी वाटेल.
Banana : रोज दोन केळी खाण्याचे फायदे, आजार पळतील दूर, या हेल्थ टिप्स नक्की वाचा
चांगली झोप, निरोगी मन - मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. झोपता तेव्हा तुमचं मन शांत होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ताजंतवानं वाटतं. दररोज सात-आठ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा आणि झोपण्यापूर्वी फोन वापरणं टाळा.
स्वतःची काळजी घ्या - दैनंदिन कामं आणि जबाबदाऱ्यांमधून, स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा. हा वेळ फक्त तुमचा आहे. या काळात तुम्ही तुम्हाला आवडेल ते करण्याचा प्रयत्न करा. संगीत ऐकणं, पुस्तक वाचणं, चित्र काढणं किंवा मित्रांशी गप्पा मारणे. हा 'मी-टाइम' तुम्हाला रिचार्ज करेल.
Skin Care : रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याचे फायदे, स्वच्छ चेहऱ्यासाठी या टिप्स वापरुन बघा
हृदयावरील ओझं हलकं करा - चिंता वाटत असेल तेव्हा ती दाबून ठेवू नका. जवळच्या मित्रांशी, कुटुंबातील सदस्यांशी किंवा विश्वासू व्यक्तीशी बोला. भावना व्यक्त केल्यानं तुमचा भार कमी होण्यास मदत होऊ शकते आणि बऱ्याचदा समस्यांवर उपाय देखील मिळू शकतात. आवश्यक असेल तर, व्यावसायिक सल्लागार किंवा थेरपिस्टचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका.