शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे
शरीराच्या वाढीसाठी आणि योग्य कार्यासाठी प्रथिने (प्रोटीन्स) आणि चरबीप्रमाणेच अनेक जीवनसत्त्वांचीही गरज असते. या जीवनसत्त्वांमध्ये 'व्हिटॅमिन सी' (Vitamin C) आणि 'व्हिटॅमिन ई' (Vitamin E) ही दोन महत्त्वाची जीवनसत्त्वे आहेत. यापैकी एक व्हिटॅमिन शरीराला रोगप्रतिकारशक्ती प्रदान करते, तर दुसरे त्वचा आणि केस यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करते. डॉक्टर्स दररोज या व्हिटॅमिन्सचे सेवन करण्याचा सल्ला देतात. याबाबत पोषणतज्ज्ञ शर्मिष्ठा कर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
advertisement
व्हिटॅमिन सी आणि रोगप्रतिकारशक्ती
पोषणतज्ज्ञ शर्मिष्ठा कर यांच्या मते, व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्तपेशींच्या (White Blood Cells) कार्याला मदत करून निरोगी रोगप्रतिकारशक्ती राखण्यास मदत करते. संसर्गाशी लढण्यासाठी या पांढऱ्या रक्तपेशी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तसेच, व्हिटॅमिन सी 'कोलेजन' (Collagen) तयार होण्यासाठी आवश्यक आहे. कोलेजन हे एक प्रोटीन आहे, जे त्वचा, हाडे, कूर्चा (कार्टिलेज) आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते.
व्हिटॅमिन सी का आवश्यक आहे?
शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि कार्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, शरीरात लोह (Iron) शोषून घेण्यासाठी, तसेच हाडांचे आणि दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठीही हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
व्हिटॅमिन सी च्या सेवनाचे फायदे
- रक्तदाब नियंत्रित ठेवते.
- रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
- स्मरणशक्ती सुधारते.
- कर्करोगापासून संरक्षण करते.
- डोळे निरोगी ठेवते.
- वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते.
- दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांचा धोका कमी करते.
हे ही वाचा : दूध आणि मासे एकत्र खाताय? थांबा! 'या' गंभीर आजारांना मिळतं निमत्रण; त्वचेवर होतात थेट परिणाम
हे ही वाचा : चिप्स खाण्याचे शौकीन असाल तर सावधान! मुलांना चिप्सपासून दूर ठेवा, अन्यथा होईल कॅन्सर अन् हृदयरोग