सोलानाइन नावाचे विषारी तत्व
बटाट्यांमध्ये नैसर्गिकरित्या सोलानाइन नावाचे एक रासायनिक संयुग असते. हे एक प्रकारचे ग्लायकोअल्कलॉइड आहे, जे बटाट्याला कीटकांपासून आणि रोगांपासून वाचवते. जेव्हा बटाटा अंकुरित होतो किंवा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो, तेव्हा सोलानाइनचे प्रमाण वाढते.
का होतात हिरवे?
जेव्हा बटाटे जास्त काळ उन्हात किंवा प्रकाशात ठेवले जातात, तेव्हा ते हिरवे होऊ लागतात. हा क्लोरोफिल नावाच्या रंगद्रव्यामुळे होणारा बदल आहे. पण, या हिरवेपणासोबतच सोलानाइनचे प्रमाणही वाढते.
advertisement
विषारी प्रमाण वाढते
अंकुरित झालेल्या बटाट्यांमध्ये सोलानाइनचे प्रमाण सामान्य बटाट्यांपेक्षा खूप जास्त असते. जर तुम्ही जास्त प्रमाणात असा बटाटा खाल्ला, तर तो तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
विषबाधेची लक्षणे
जास्त प्रमाणात सोलानाइनचे सेवन केल्यास विषबाधा होऊ शकते. याची लक्षणे मळमळ, उलट्या, पोटदुखी, जुलाब आणि डोकेदुखी आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
अंकुरित बटाटे खावे की नाही?
अंकुरित किंवा हिरवे झालेले बटाटे पूर्णपणे विषारी नसतात. जर बटाट्यावर लहान अंकुर असतील आणि तो जास्त हिरवा झाला नसेल, तर तुम्ही ते अंकुर आणि हिरवा भाग कापून टाकू शकता.
सुरक्षित पर्याय
ज्या बटाट्यांवर मोठे अंकुर आले आहेत, किंवा जे पूर्णपणे हिरवे झाले आहेत, ते खाणे टाळा. नेहमी ताजे आणि व्यवस्थित साठवलेले बटाटेच वापरा. बटाटे नेहमी थंड आणि अंधाऱ्या जागी ठेवा. अंकुरित बटाटे पूर्णपणे विषारी नाहीत, पण सोलानाइनचे प्रमाण वाढल्याने ते आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक असू शकतात. त्यामुळे असे बटाटे खाण्यापूर्वी योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)