TRENDING:

Health Drink : चरबी कमी करणारं 'मॅजिक ड्रिंक', बनवायला अगदी सोपं, जाणून घ्या सविस्तर

Last Updated:

हेल्दी ड्रिंकमुळे चयापचयाचा वेग वाढतो. हळद आणि दालचिनीमुळे चरबी जाळण्यास मदत होते. बडीशेप आणि ओवा गॅस, पोटफुगी आणि अपचनापासून आराम देतात. चरबी जाळण्यासाठी हे पेय उपयुक्त ठरतं. मेथीच्या दाण्यांमुळे भूक नियंत्रित करणं शक्य होतं. त्यामुळे अतिरिक्त खाल्लं जात नाही. यामुळे शरीर उर्जेसाठी अतिरिक्त चरबी जाळतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोशल मीडियावर अनेकदा वजन कमी करण्यासाठी काय करायचं ? कोणते व्यायाम करुन चरबी कमी करता येते या विषयावरचे रिल्स वाढताना दिसतायत. कारण त्याची सर्वाधिक गरज आहे.
News18
News18
advertisement

कारण आजकाल अनेकांसाठी लठ्ठपणा ही एक मोठी चिंता आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. तुम्हालाही हीच चिंता सतावत असेल तर ही माहिती उपयुक्त ठरू शकते. होलिस्टिक न्यूट्रिशनिस्ट देवयानी यांनी अलीकडेच इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत, त्यांनी एका मॅजिक ड्रिंकची माहिती दिली आहे. या पेयामुळे शरीरातील चरबी कमी करणं शक्य होऊ शकतं.

advertisement

Diwali Diet : दिवाळीचा फराळ खाताना या गोष्टी लक्षात ठेवा, पोट राहिल ठणठणीत

मॅजिक ड्रिंक बनवण्यासाठी, तीन चमचे मेथीचे दाणे, तीन चमचे हळद पावडर आणि तीन चमचे ओवा, तीन चमचे बडीशेप आणि दालचिनीच्या दोन काड्या असं साहित्या लागेल. पेय बनवसाठी, सर्व घटक एकत्र बारीक करा.

तयार केलेलं मिश्रण हवाबंद डब्यात ठेवा. या मिश्रणाचा एक चमचा अर्धा ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्रत्येक जेवणाच्या सुमारे तीस मिनिटं आधी ते प्या असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

advertisement

या पेयामुळे चयापचयाचा वेग वाढतो. हळद आणि दालचिनीमुळे चरबी जाळण्यास मदत होते. बडीशेप आणि ओवा गॅस, पोटफुगी आणि अपचनापासून आराम देतात. चरबी जाळण्यास उपयुक्त ठरतं. मेथीच्या दाण्यांमुळे भूक नियंत्रित करणं शक्य होतं. त्यामुळे अतिरिक्त खाल्लं जात नाही. यामुळे शरीर उर्जेसाठी अतिरिक्त चरबी जाळतं.

Dry Skin : वातावरणासोबतच ही जीवनसत्वंही आवश्यक, या स्किन केअर टिप्स ठरतील उपयोगी

advertisement

या पेयामुळे, आतड्यांचं आरोग्य सुधारतं. शिवाय, या मिश्रणामुळे दाहक-विरोधी आणि विषारी पदार्थ काढून टाकणारे गुणधर्म असतात. यामुळे आतड्यांचं आरोग्य वाढतं आणि वजन कमी करण्यास मदत होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीसाठी स्टायलिश कुर्तीज, किंमत 300 रुपये,मुंबईतील या मार्केटमध्ये करा खरेदी
सर्व पहा

हे पेय वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. याचे परिणाम जाणवण्यासाठी सातत्य आवश्यक आहे. म्हणून, हे पेय नियमितपणे, दिवसातून दोनदा, सलग तीस दिवस प्या. तरंच, एका महिन्यात परिणाम दिसतील असाही सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Drink : चरबी कमी करणारं 'मॅजिक ड्रिंक', बनवायला अगदी सोपं, जाणून घ्या सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल