TRENDING:

Monsoon Tips: पावसाळ्यात गांडूळ अन् गोम फिरकणारही नाहीत, तुमच्या फायद्याचे 5 उपाय!

Last Updated:

Monsoon Tips: पावसाळ्यात घरात गांडूळ, गोम आणि इतर सरपटणारे प्राणी यांचा धोका वाढतो. तेव्हा तुम्ही फक्त 5 घरगुती उपायांनी या त्रासापासून सूटका मिळवू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: पावसाळा सुरू झाला की जमिनीत राहणारे गांडूळ, गोम, कीटक आणि इतर सरपटणारे प्राणी उष्णता व पाण्यापासून बचावासाठी बाहेर पडतात. जमिनीवरची घरं आणि बागेशी लागून असलेल्या घारत यांची घुसखोरी होते. त्यामुळे पावसाळ्यात नव्या संकटाला सामोरं जावं लागंत. गांडूळ जरी बिनविषारी असले, तरी घरात त्यांचं फिरणं त्रासदायक ठरू शकतं. विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्धांना याचा त्रास होतो. पण काळजी करू नका काही घरगुती उपायांनी हे गांडुळे घरात शिरण्यापूर्वीच अडवता येतात. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement

रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळा!

पावसाळ्यात गांडूळ, गोम किंवा इतर सरपटणारे प्राणी घुसतात. विशेषत: जिन्याखालची जागा, बेसमेंट, बाथरूममधील ड्रेनेज, वॉशिंग मशीन मागची जागा ही गांडुळांच्या प्रवेशासाठी सहजतेची ठिकाणं ठरतात. अनेक जण गांडुळे रोखण्यासाठी रासायनिक उपाय वापरतात. मात्र हे उपाय केवळ तात्पुरते असतात आणि त्यांचे परिणाम आपल्या आरोग्यावर व पर्यावरणावर घातक असू शकतात. यामुळे घरगुती व नैसर्गिक उपाय यास प्राधान्य द्यावं, जे प्रभावीही ठरतात आणि सुरक्षितही.

advertisement

Monoosn Heath Care: पावसाळ्यात ‘फूट अल्सर’चा धोका, दूर्लक्ष नको, अशी घ्या काळजी!

गांडूळ फिरकणार नाहीत, हे उपाय करा

  1. हळद आणि मीठ: हळद आणि मीठ समप्रमाणात मिसळून दरवाज्यांजवळ, खिडक्यांच्या कडांवर आणि घराच्या आतल्या कोपऱ्यांमध्ये शिंपडल्यास गांडुळे आत येत नाहीत. हळदीतील अँटीसेप्टिक गुणधर्म आणि मीठाचा कोरडेपणा कीटकांना त्रासदायक ठरतो.
  2. advertisement

  3. लसूण पेस्ट: लसूण वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि ती घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा जिथे गांडुळे दिसतात अशा कोपऱ्यांत लावा. लसूणाचा तीव्र वास गांडुळे आणि इतर कीटक सहन करू शकत नाहीत.
  4. व्हिनेगर आणि पाणी स्प्रे: एक भाग सफेद व्हिनेगर आणि एक भाग पाणी मिसळून तयार केलेलं मिश्रण स्प्रे बाटलीत भरून घराच्या कोपऱ्यांत, खिडक्यांजवळ आणि बाथरूम परिसरात फवारा. याचा वास आणि अ‍ॅसिडिक गुणधर्म गांडुळे दूर ठेवतो.
  5. advertisement

  6. बागेची निगा आणि स्वच्छता: बागेत पाणी साचू देऊ नका. कुजलेली पाने, वाळलेली फुलं वेळेवर काढून टाका. गांडुळे मुख्यतः अशा ओलसर, सडलेल्या जागांकडे आकर्षित होतात.
  7. ड्रेनेजची स्वच्छता: बाथरूममधील नाले, सांडपाण्याचे मार्ग स्वच्छ आणि बंद ठेवावेत. हे मार्ग गांडुळांच्या घरात येण्याच्या मुख्य वाटा असतात.

काळजी घेतली, तर त्रास टाळता येतो. या उपायांनी तुम्ही आणि तुमचं कुटुंब पावसाळ्यातही आरामात, स्वच्छतेत राहू शकाल.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Monsoon Tips: पावसाळ्यात गांडूळ अन् गोम फिरकणारही नाहीत, तुमच्या फायद्याचे 5 उपाय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल