मुंबई: मुंबईतील विविध मार्केट जगभर प्रसिद्ध आहेत. बांद्रामधील घास बाजार म्हटलं की होलसेल मार्केट आणि मॅन्यूफॅक्चरींग बाजार हेच डोळ्यासमोर येतं. या बाजारात तुम्हाला कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत सगळ्याच गोष्टी होलसेल मध्ये मिळतात. पण या व्यतिरिक्त या घास बाजारात एक डेनिम गल्ली आहे. जिथे सगळ्या प्रकारचे डेनिमचे कपडे होलसेलमध्ये मिळतात. याच गल्लीमध्ये सी.एम. कलेक्शन हे होलसेल दुकान असून येथे 270 रुपयांपासून डेनिमचे जॅकेट मिळतात.
advertisement
स्वस्तात मस्त डेनिम जॅकेट
डेनिम गल्लीत 2 वर्षांपासूनच्या लहान मुला-मुलींचे डेनिमच्या जॅकेट तसेच डंगरी पॅटर्नचे कपडे मिळतील. डेनिम जॅकेटची किंमत फक्त 270 रुपयांपासून सुरू होते. 500 रुपयांपर्यंत अनेक व्हरायटीचे जॅकेट मिळतात. मुख्य म्हणजे डेनिमच्या जॅकेटमध्ये मोठ्यापासून ते लहानांपर्यंत सगळ्यांच्या मापाचे जॅकेट इथे मिळतात.
कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा; हा व्यवसाय करेल महिन्यात मालामाल video
डेनिमसोबत आणखी एक व्हरायटी इथे पाहायला मिळते ते म्हणजे ज्यूट पासून बनवलेले जॅकेट होय. ज्यावर हटके डिझाईन आणि रंग-संगती पाहायला मिळते. डेनिममध्ये हे जॅकेट फार उठून दिसतात. तुम्ही ते कोणत्याही जिन्सवर घालू शकता. तसेच अगदी स्कर्टवर एखाद्या ट्यूब टॉप किंवा स्लिवलेस टॉपवरही हे जॅकेट घालू शकता. या जॅकेटची किंमत सुरु फक्त 300 रुपयांपासून सुरू होते. तर, लहान मुलांच्या डेनिम जॅकेटची सुरुवात 270 ते 290 रुपयांपासून सुरू होते. पुढे पॅटर्ननुसार सगळ्याच जॅकेटची किंमत बदलत जाते.
घास बाजारातील डेनिम गल्लीकडे जायचं कसं?
बांद्रा पूर्व येथील गेट नंबर 18, घास गल्ली येथे हे सी.एम. कलेक्शन हे दुकान आहे. तसेच ही पूर्ण गल्लीच डेनिम गल्ली असल्याचं पाहायला मिळते. इथे जवळपास 10 ते 12 दुकाने फक्त डेनिमच्याच कपड्याची दिसतील. बांद्रा स्टेशनच्या पूर्वेकडे उतरल्यानंतर अगदी 5 मिनिटांच्या अंतरापासूनच घास बाजाराला सुरुवात होते आणि तिथूनच डेनिम गल्ली देखील सुरु होते.
मुंबईतील 400 वर्षांपूर्वीचं हेरिटेज गाव, घरांच्या भिंतीवर चक्क कलाकारांचे पेंटिंग, Video
डेनिमच्या जॅकेटचा व्यवसाय कसा सुरू करू शकता?
जर तुमचं बजेच बऱ्यापैकी असेल तर तुम्ही सुरुवातीला 15 ते 20 पीस घेऊन तुमचा व्यवसाय सुरु करु शकता. नेहमीच्या बाजारात एका डेनिमच्या जॅकेटची किंमत 600 ते 2 हजारांच्या घरात असते. पण होलसेलमध्ये जॅकेट तुम्हाला फक्त 200 ते 270 रुपयांपासून मिळतं. त्यामुळे नक्कीच ते परवडणारं आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला अगदी 10 ते 12 पीस घेऊन देखील घरगुती व्यवसाय सुरु करू शकता. तसेच सुरुवातीला फक्त 5 ते 6 पीस घ्यायचे असतील तरीही तुम्ही घेऊ शकता, असे दुकानदार सांगतात.
एवढं स्वस्त कुठंच नाही, चक्क किलोवर मिळतायेत कपडे, चिंधी मार्केट माहितीये का? Video
पार्सलची सुविधा उपलब्ध
जर तुम्हाला पार्सल किंवा कुरीअरद्वारे डेनिम जॅकेटचा माल मागवायचा असल्यास तुम्हाला कमीतकमी 50 पीस घेणं आवश्यक आहे. तसेच जर तुम्हाला फक्त या व्यवसायासाठी अंदाज काढायचा असेल, जॅकेटची किंमत किती आहे किंवा परवडणारी आहे का? या सगळ्यांबद्दल सल्ला हवा असेल, तर या गल्लीतील दुकांनांना भेट देऊन चौकशी करू शकता. या गल्लीतून रोज सुमारे लाखोंच्या संख्येनं डेनिमच्या कपड्यांचा माल जात असतो, असेही दुकानदार सांगतात.
दागिने, कुर्ती, साड्या या पर्यायांपेक्षा तुम्ही तुमचं बजेट डेनिममध्ये गुंतवण्याचा विचार करत असला तर घास बाजारातील घास गल्ली एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला इथे बऱ्याच पॅटर्नचे डेनिमचे कपडे पाहण्याची आणि निवडण्याची संधी मिळेल.