मुंबई: खरेदीचा विषय आला की सर्वांना मुंबईतील प्रसिद्ध मार्केट आठवतात. आपणही एखाद्या खास व्यक्तीला खास गिफ्ट देण्यासाठी किंवा स्वत:साठी एखादी युनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट उत्तम पर्याय आहे. इथं एक आकर्षक बास्केट मिळणारं दुकान असून अनेक व्हरायटीच्या बास्केट अगदी स्वस्तात मिळतात. अगदी 30 रुपयांत मिळणाऱ्या बास्केट तुम्ही एखाद्याला भेट म्हणूनही देऊ शकता. लोकल18च्या माध्यमातून आपण याच दुकानाबाबत जाणून घेऊ.
advertisement
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उतरल्यावर फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर क्रॉफर्ड मार्केट आहे. मार्केटमध्ये येताच तुम्हाला बांबूंच्या वस्तू आणि बास्केट विकणारं एकमेव दुकान दिसेल. इथं विविध आकार आणि व्हरायटीच्या बास्केट मिळतील. यात लहान बास्केट फक्त 30 रुपयांपासून मिळतात. घरात चॉकलेट ठेवण्यासाठी किंवा इतरांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी देखील ही बास्केट तुम्ही वापरू शकता.
एक चांगली आयडिया अन् तरुणीचं नशीब बदललं, कॉलेज करूनही करते व्यवसाय, पैशांची अडचण दूर!
किती आहेत किमती?
सध्याच्या घडीला बेबी फोटोशूट खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. जर तुम्हाला बेबी फोटोशूटसाठी च बास्केट हवी असेल, तर या ठिकाणी ती तुम्हाला फक्त साडेतीन हजार रुपयांमध्ये मिळून जाईल. लग्नामध्ये रुखवतासाठी वापरण्यात येणारी बास्केट, फ्रुट बास्केट किंवा पिकनिक बास्केट अशा सर्व बास्केटच्या व्हरायटी तुम्हाला या दुकानात सहज मिळून जातील. याशिवाय जर तुम्हाला सुटकेसच्या आकाराची बास्केट हवी असेल तर ती देखील फक्त 2 हजार रुपयांपासून मिळून जाईल.
बांबूच्या मटेरियलची सर्वात लहान बास्केट इथे तुम्हाला फक्त 200 रुपयांपासून मिळते. तर आयत आणि अंडाकृती आकाराची बास्केट फक्त 650 रुपयांपासून मिळेल. या सर्व बास्केट शिवाय ॲल्युमिनियमची बास्केट सुद्धा इथं उपलब्ध असून ती 150 रुपयांत मिळेल. कोणत्याही प्रकारच्या लॅम्पची शोभा वाढवण्यासाठी लॅम्प कव्हर खूप महत्त्वाचा असतो. या दुकानात तुम्हाला हजार रुपयांपासून बांबूच्या मटेरियलचे लॅम्प कव्हर वेगवेगळ्या आकारात मिळतील. त्यामुळे युनिक आणि खास पर्यावरणपुरक खरेदी करायची असेल तर क्रॉफर्ड मार्केटमधील या दुकानाला भेट देऊ शकता.