जाणून घेऊयात डायबिटीस टाळण्याचे सोपे उपाय :
advertisement
व्यायाम करा : आजच्या व्यस्त जीवनशैलीत अनेकांना व्यायम करणं शक्य होत नाही. तुम्हाला रोज जीममध्ये जाऊन व्यायाम करता नाही आला तरी चालेल पण दिवसातून थोडासा वेळ तरी हलका व्यायाम किंवा चालण्यासाठी काढा.
एकाच जागी बसून काम करणं टाळा : सध्याच्या कॉर्पोरेट लाईफस्टाईलमुळे ऑफिसमध्ये एकाच जागी तासन्तास बसून काम करावं लागतं. असं केल्याने सुद्धा इन्सुलिनच्या पातळीवर बदल होतो. त्यामुळे ऑफिसमध्ये एकाच जागी जास्त वेळ बसून काम करणं टाळा. कामातून ठराविक वेळेनंतर ब्रेक घ्या. ऑफिसमध्ये थोडसं चाला.
अपुरी झोप : अपुरी झोप किंवा रात्री उशीरा झोपल्यामुळे सुद्धा रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात हार्मोन्सच्या असंतुलनामुळे रक्तातली साखर वाढते. त्यामुळे टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
सततचा ताण : सततचा ताण आणि मानसिक दबावामुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. तणावामुळे मधुमेही रुग्णांची शारीरिक स्थिती बिघडू शकते.
डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
डायबिटीस असलेल्या व्यक्तींना वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक असते, आणि पपई वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय पपईत व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, आणि बीटा-कॅरोटीनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करतात.हे अँटीऑक्सिडंट्स हृदय आणि इतर अवयवांचे संरक्षण करण्यास मदत करतात. कारले, दोडका, भोपळा, दुधीभोपळा, वांगी या भाज्यांमध्ये फायबर्स जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे जेवण पचायलाही मदत होते आणि पोटसुद्धा भरलेलं राहतं त्यामुळे अतिरिक्त भूक नियंत्रणात राहते. शुगर कंट्रोल करण्यासाठी साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि तळलेले पदार्थ यांचे सेवन कमी करा. जर तुम्हाला डायबिटीसची लागण झाली असेल तर डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आणि पथ्यं व्यवस्थित पाळा म्हणजे तुमचा डायबिटीस नियंत्रणात राहायला मदत होईल.